फोंडाघाट : गेले तीन ते चार दिवस उष्म्यात वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळले होते. त्यात उष्म्यामुळे अधिकच भर पडली. या पार्श्वभूमीवर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला.या पावसाचा जोर इतका होता की गटारे, ओहोळ वर्षभराच्या साठलेल्या कचऱ्याने तुडुंब वाहू लागले. काही ठिकाणी गटारातील घाण काढण्यासाठी तारांबळ उडाली. हवेतील गारवा सर्वांनाच सुखावून गेला. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून आता भातपेरणीला सर्वजण सुरुवात करतील अशी शक्यता आहे.सध्या मुंबईकरांचा ओढा गावाकडे असल्याने क्वारंटाईन वास्तव्य संपल्यानंतर पुन्हा मुंबईला जाण्याची घाई न करता, ते आपल्या घरातील लोकांना शेतीकामात मदत करणार आहेत. या पावसामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीची आस लागून राहिली आहे.
धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:07 IST
गेले तीन ते चार दिवस उष्म्यात वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळले होते. त्यात उष्म्यामुळे अधिकच भर पडली. या पार्श्वभूमीवर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला.
धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला...
ठळक मुद्देधुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला...