शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ग्राहकांची विद्युत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती, सावंतवाडीत सर्व पक्षीय बैठक

By अनंत खं.जाधव | Updated: May 30, 2024 18:13 IST

सावंतवाडी : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अनेक गावे अधांरात होती. यामुळे संतापलेल्या वीज ...

सावंतवाडी : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अनेक गावे अधांरात होती. यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच जर यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यावेळी विद्युत अभियंता विनोद पाटील यांनी आमच्यात काही त्रुटी राहिल्या असतील आम्ही त्या दूर करू पण पावसाळ्यात विद्युत पुरवठा सुरळीत राहिल यांची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. वीज वितरणचा भोगळ कारभाराबाबत गुरूवारी येथील एका हॉटेलमध्ये विद्युत वितरणचे अधिकारी व ग्राहकांची संयुक्त बैठक पार पडली.या बैठकीला माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर,  अध्यक्ष सीताराम गावडे, शिंदे सेनेचे अशोक दळवी, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आदीसह शेकडो वीजग्राहक उपस्थित होते.सुरूवातीपासूनच विद्युत वितरणच्या गैरकारभारा विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या. बैठकीत ग्राहकांनी तक्रारीची जंत्री मोजली. एका पाठोपाठ एक ग्राहक आक्रमक होत गेला. अभियंता पाटील यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत विद्युत वितरणच्या गलथान कारभाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच कामात सुधारणा होईल असे आश्वासन दिले.प्रिपेड मिटर विरोधाचा एकमुखी ठराव अॅड. संदीप निंबाळकर तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रिपेड वीज मिटर विरोधी ठराव मांडला त्याला सर्वानी एकमुखी पाठिंबा दिला.  प्रिपेड मिटर जिल्ह्यात आणल्यास शासन उधळवून लावायची ताकद ग्राहकांत असल्याची भावना साळगावकर यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीelectricityवीजRainपाऊसmahavitaranमहावितरण