शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:26 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवालनियमित कर्जदारांवर अन्याय  : एम. के. गावडे

वेंगुर्ला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.वेतोरे येथील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटीतर्फे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभा वेतोरे सोसायटीच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन विजय नाईक, कृषी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी शिवराम गोगटे, संतोष गाडगीळ, प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक, चंद्रकांत वालावलकर, उत्तम वालावलकर, विश्वनाथ गावडे, समीर गोसावी, वर्षा नाईक, गीता गावडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व सभासद उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५००० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. क्यार नावाच्या चक्रीवादळाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. जिल्ह्यातील कापणीस तयार झालेल्या भातपिकाचे जवळपास ६० टक्के पूर्ण नुकसान झाले. भातपिकासोबतच अन्य खरीप पिके, भाजीपाला व कंदवर्गीय पिके या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले.ढगफुटीप्रमाणे अवेळी कोसळणारा पाऊस बागायती पिकांसाठीदेखील कर्दनकाळ ठरला आहे. जानेवारी महिन्याची १०तारीख उजाडली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के आंबा बागायतींना अजून मोहोर आलेला नाही. आता यापुढे जरी हवेत गारठा वाढला तरीही आंब्याचा संपूर्ण हंगाम किमान ५० दिवसांनी पुढे गेला आहे. याचा अर्थ मे अखेरीस आंबा आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल.जूनपासून पुन्हा पावसाची चाहूल लागणार असल्याने आंबा फळे खराब होण्याची भीती दिसत आहे. आंब्यात एक वर्ष आड मोठी फळधारणा होत असल्याने पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा ही झाडे व्यवस्थित फळे देतील याची खात्रीनाही.परतीच्या व अवकाळी पावसामुळे जूनपासून झाडांवर केलेला खर्च पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सहकारास जागत प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र, स्वत:चा दागिना मोडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली. त्यामुळे कर्ज नियमित भरणे हा त्यांनी गुन्हा केला की काय अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे, असेही यावेळी गावडे यांनी सांगितले.सातेरी सोसायटीने उठविला आवाजनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटी वेतोरे या संस्थेने सर्वप्रथम आवाज उठविला आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारी सोसायट्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन सभासदांची बैठक आयोजित करून त्याबाबत योग्य तो ठराव शासनाकडे देण्यात यावा, असे आवाहन वेतोरे सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम वालावलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग