शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:40 IST

Tourist: पर्यटकांकडून विचारणा : वातावरण होतेय आल्हाददायक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्ग :  कोकणातीलपर्यटनाचा उन्हाळी हंगाम ठप्प झाला असला, तरी आता नोव्हेंबर महिना सुरू होताच पर्यटनाच्या हिवाळी हंगामाला सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. तसेच आता वातावरणही आल्हाददायी होत असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.

 २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले होेते. यावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे अशा सर्वच स्थळांवर बंदी घातली होती. कोरोनाची भीती आणि बंदी यामुळे पर्यटकांनी गेल्या आठ महिन्यांपासून या सर्वच स्थळांकडे पाठ फिरविली होती.  मात्र, आता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढत आहे. काही महिन्यांपासून घरातच राहिलेले पर्यटक हळूहळू पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत.पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटक प्राधान्य देत असून या निवासस्थानांचे आरक्षण सुरू झाले आहे. आताच सुमारे ४० टक्के निवासस्थानांचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे हा हंगाम चांगला जाईल, असा विश्वास पर्यटन विकास महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.संपूर्ण कोकणात पर्यटनाला चांगली सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या अनुंषगाने योग्य ती खबरदारी एमटीडीसीकडून घेतली जात आहे.   - दीपक माने, प्रादेशिकव्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळ, कोकण विभागव्यवसाय वाढीची अपेक्षापर्यटन विकास महामंडळाच्या व्यवसायातील ६० टक्के व्यवसाय हा उन्हाळी हंगामात होत असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उन्हाळी पर्यटन थांबल्यामुळे हा व्यवसाय केवळ २५ ते ३० टक्केच झाला. त्यामुळे पर्यटन महामंडळाला हिवाळी पर्यटन चांगले जाईल, अशी आशा वाटत आहे.

टॅग्स :konkanकोकणtourismपर्यटन