शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक शाळेत 'हॅप्पी सॅटर्डे' संकल्पना राबविणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली घोषणा

By अनंत खं.जाधव | Updated: February 14, 2024 17:33 IST

सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप 

सावंतवाडी : शालेय शिक्षण घेताना मुले खुश राहावीत यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला यांचे शिक्षण तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप कार्यक्रमात मुंबई येथून ते ऑनलाईन बोलत होते.यावेळी एन.सी.आर.टी चे प्राध्यापक टी.पी शर्मा, राधा अतकरी, प्रदीप कुडाळकर, वासुदेव नाईक, अच्युत भोसले, कल्पना बोडके, म.ल. देसाई, कृष्णकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे, प्रवीण राठोड,  प्रियांका देसाई, कैलास चव्हाण, अवधूत मालणकर, महेश चोथे, डॉ. आचरेकर, लक्ष्मीकांत बानते, जयंत भगत, प्रसाद महाले आदि उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती कौतुकास्पद होत्या. विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी यापुढे आपली वाटचाल करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात मुलांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे यासाठी “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेत अंतर्गत दर शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास वगळून संगीत, नाट्य, कला आदी क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आगामी काळात पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे. अन्नधान्यात भारत देश स्वयंपूर्ण व्हावा हा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात सर्व देश अन्नधान्याच्या बाबतीत कमी पडले. परंतु भारत देश केवळ शेतकऱ्यांमुळे अडचणीत आला नाही हे गौरवास्पद आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे कृषी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ही मंत्री केसरकर यांनी केले आहे.यावेळी संचालक कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करतानाच मुलांनी विज्ञान चे ज्या प्रकारे प्रदर्शन थाटले ते सर्वाना प्रेरणा देणारे असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाDeepak Kesarkarदीपक केसरकर