शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: चिंदरवासीय लुटताहेत निसर्गाचा आनंद, व्हॉट्सअ‍ॅप जमान्यातही हरीनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:00 IST

चंद्राच्या प्रकाशात गप्पांचे फड रंगले होते. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत चिंदरवासीय नैसर्गिक पद्धतीने राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत.

ठळक मुद्देचिंदरवासीय लुटताहेत निसर्गाचा आनंदव्हॉट्सअ‍ॅप जमान्यातही हरीनामाचा गजर

आचरा : एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या झोपड्या, झोपडपट्ट्यांमधूनच एकमेकांसोबत राहिलेला मुक्त संवाद, चुलीवर जेवणाचा खमंग सुवास आणि लहानग्यांच्या किलबिलाटाने आचरा गावच्या गावपळीचा पहिला दिवस उजाडला. रात्री चंद्राच्या प्रकाशात गप्पांचे फड रंगले होते. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत चिंदरवासीय नैसर्गिक पद्धतीने राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत.शनिवारी दुपारी ढोलांच्या आवाजानंतर गाव सोडलेले चिंदरवासीय सीमेबाहेर स्थिरावले आहेत. आचरा सीमेलगत माळरानावर, मसुरे हद्दीत नदीच्या कुशीला, तर काहींनी वायंगणी गावात आपले संसार थाटले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ना शाळेचे टेन्शन, ना क्लासची भुणभुण असे गोष्टीतील जीवन अनुभवायला मिळत आहे. युवा वर्गाने थेट नदीपात्र गाठत मासेमारीला सुरूवात केली होती. महिला वर्ग तर आता घरे लगतच असल्याने बसल्याजागेवरून गप्पांचे फड रगवताना दिसत होता. सर्वांनी तिखट जेवणाने गावपळणीची पहिली रात्र जागविली, महिलावर्ग सामुदायिक स्वयंपाकाचा आनंद घेत आहेत.

गावपळणीत हरिनामाचा गजर घालताना दंग झालेले गावकरी

महिलांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये शेजारपणाचे नाते अधिक घट्ट झालेच, शिवाय विचारांची देवाणघेवाणही झाली. इलेक्ट्रॉनिक साधने आणि मनोरंजनाची साधने घराघरात पोहोचली असताना सीमेबाहेर असणारे माणसे मात्र या विजेविनाच वावरताना दिसत होती.व्हॉट्सअ‍ॅपच्या जमाना असताना मात्र चिंदर गावपळणीत युवकवर्ग प्रौढांसमवेत मिळालेल्या निवांत वेळेत हरीनामाचा गजर करताना दिसत आहेत. गाव वेशीबाहेर स्थलांतरित होताना चिंदर गावातील ग्रामस्थांनी भजनाची पेटी, तबला,टाळ आपल्यासोबत आणली होती. मिळालेल्यावेळेत मोबाईलसारखे उपकरण बाजूला ठेवून गावातील बुवाला साथ देत गावकरी हरीनामाचा गजर घालताना तल्लीन होताना दिसत आहेत.रोजची घरातील कुणाची कुरकुर नाही की समस्या नाही. जणू काही समस्या शिल्लक नाहीत. अशा मोकळ््यावातावरणात निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद चिंदरवासीय मिळवित आहेत.

गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव जवळपास निर्मनुष्य झाले असून केवळ रस्त्याचावापर करून पुढे जाणार्या वाहनांचीच वर्दळ पहायला मिळते आहे. गावाचे ग्रामदैवत रवळनाथावर नितांत श्रद्धा चिंदरमधील ग्रामवासीयांची आहे. त्यामुळे श्रद्धेने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग