सिंधुदुर्ग : सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच 'पालकमंत्री कक्ष' सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी उपस्थित असणार आहेत.जिल्हा प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य जनतेचे अनेक विषय असतात. अनेकदा त्यांना प्रशासकीय पातळीवर खेपा माराव्या लागतात. काहीवेळा विषय मार्गी लागण्यास अडचणीही येतात. अशावेळी सर्वसामान्यांना आपले विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच पालकमंत्री कक्ष स्थापन होणार आहे. यासाठीची जागाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच जनता दरबाराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनतेची थेट भेट घेत त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावणार आहेत. सामान्य जनतेला प्रशासकीय पातळीवर कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी ही पावले उचलली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे.
सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार 'पालकमंत्री कक्ष' - नितेश राणे
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 18, 2025 12:10 IST