शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'काजू बी'ला प्रति किलो २०० रूपये हमीभाव द्या, बागायतदार आक्रमक; सावंतवाडीत धरणे आंदोलन

By अनंत खं.जाधव | Updated: February 16, 2024 17:43 IST

सावंतवाडी : काजू बी ला किमान प्रति किलो २०० रुपये हमीभाव देण्यात यावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू ...

सावंतवाडी : काजू बी ला किमान प्रति किलो २०० रुपये हमीभाव देण्यात यावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा. तसेच काजू गरावर २० टक्केहून अधिक आयात शुल्क आकारावे, या मागण्यांसाठी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदारांनी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले आहे.यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग फळबागायत संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी धरणे आंदोलनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे  लखमसावंत भोसले यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठींबा दिला. सावंत म्हणाले की, काजू हे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वीस वर्षात मजुरी १० पट, खतांच्या किमती १३ पट वाढल्या. मात्र काजू बीचा दर दुप्पट सुद्धा झाला नाही. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. काजू बी ला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाभरात गावोगावी काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या नियोजन बैठका होत आहेत. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादक संघटना, काजू समूह गोपुरी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना आणि शेतकरी संघ दोडामार्ग या संघटना सहभागी झाल्या आहेत. असे ते म्हणाले.यावेळी सुरेश गावडे, रघुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, नितीन मावळणकर, प्रवीण देसाई, जगदेव गवस, सुरेश गावडे, सदाशिव गाड, नितीन सावंत, घनश्याम नाईक, बाळा परब, प्रकाश वालावलकर, लक्ष्मण निगुडकर, प्रदीप सावंत, संजय लाड, राजन देसाई, प्रमोद कामत, बाबल ठाकूर, संतोष परब, मंगेश देसाई, शशिकांत सावंत, सुभाष सावंत, पप्पू सावंत, विजय राऊळ, गुरुनाथ गवंडे, सुरेश गवस, गुणाजी गावडे आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग