शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

गडनदी पुलानजीक महामार्ग जोडरस्ता खचला, सुदैवाने दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:28 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

ठळक मुद्देठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष; ग्रामस्थांनी वाहतूक रोखलीप्रांताधिकारी, तहसीलदारांकडून घटनेची पाहणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.दरम्यान, जोडरस्त्याचा भराव खचल्याची बाब लक्षात येताच गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी धोकादायक रस्त्यावरून जाणारी वाहतूक रोखली. त्यावेळी प्रशासनाला जाग आली. तर मुजोर ठेकेदाराने पुन्हा भराव करून सुरक्षित काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखलेली वाहने एकेरी वाहतूक सुरू करून सोडण्यात आली. भराव खचल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने सावित्री पुलाच्या दुर्घटनेसारखी घटना टळली आहे.

खचलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांनी वाहतूक रोखून ठेवली होती.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली गडनदी पुलावर जुने पूल तोडून शेजारी नव्याने पूल उभारण्यात आले आहे. श्रीधर नाईक गार्डन ते हळवल हद्दीपर्यंत हे पूल उभारण्यात आले आहे.

या आरसीसी पुलाच्या भिंतीला जोडून मातीचा भराव करून जोडरस्ता बनविण्यात आला होता. वागदे गावच्या बाजूने असलेला हा जोडरस्ता पहिल्याच पावसात सुमारे २० फूट खोल खचला आहे. जर हा भराव मध्यरात्री अचानक खचला असता तर सावित्री पुलासारखी मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेबाबत प्रशासनाला सायंकाळी ४ वाजता माहिती मिळाली.तहसीलदार संजय पावसकर त्यानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब संबंधित ठेकेदाराला संपर्क साधला. तरी दोन तास त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरत वाहने रोखून धरली.गडनदीवरील एक पूल पूर्ण झाल्यानंतर त्यालगत जुन्या पुलाच्या जाग्यावर दुसरे पूल उभारण्यात येत आहे़. मधल्या दहा फुटांच्या गॅपमध्ये आरसीसी भिंत पुलाच्या उंचीने न उभारल्याने जोडरस्त्याचा भराव खचत गेला.

हा भराव बुधवारी सायंकाळपासून खचत होता. गुरूवारी दुपारपर्यंत हा भराव खचत मध्यरस्त्यापर्यंत आला. तरीही ठेकेदाराकडून केवळ बॅरल लावून ठेवण्यात आला होता. जाणीवपूर्वक या खचलेल्या भरावाकडे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकारी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.तहसीलदारांच्या सुचनेनंतरही या कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे घटनास्थळी प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आदी अधिकाºयांसह प्रशासकीय कर्मचारी दाखल झाले होते. तसेच ग्रामस्थांनी रस्ता रोखल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.घटनास्थळी महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी येण्यास विलंब झाला. काही वेळाने साईट सुपरवायझर कौशिक खडदा त्या ठिकाणी आले. यावेळी स्वाभिमान पक्षाचे संदीप सावंत, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रूपेश आमडोसकर, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी कौशिक खडदा यांना चांगलेच धारेवर धरले.लोकांचा जीव गेल्यावर खचलेला भराव दुरूस्त करणार का? लोकांच्या मरणाची वाट पाहता का? गंभीर घटना घडल्यास तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा नागरीकांनी यावेळी दिला संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षकांनी ह्यमी स्वत: उभा राहून हा रस्ता तयार करून घेतो. कोणीही काळजी करू नका. वाहतूक सुरळीत करूयात,ह्ण असे ग्रामस्थांना आवाहन केले़. त्याला प्रतिसाद देत रोखलेली वाहतूक सोडण्यात आली.धोकादायक खचलेल्या भरावाच्या ठिकाणी काम करण्यास दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर यंत्रणा लावली़ डंपरचा वापर करून त्या ठिकाणी नव्याने भराव करण्यात आला़ पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी घटनास्थळी थांबले होते. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी खचलेल्या भरावाची डागडुजी करण्यात येत होती. गडनदी पुलावरून एकेरी वाहतूक करून हे काम करण्यात आले़.कणकवलीत वाहतुकीची कोंडीमुंबई-गोवा महामार्गावर नव्याने तयार करण्यात आलेल्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचताच वाहतूक रोखण्यात आली़ त्यामुळे वागदे व कणकवलीच्या बाजूने दुतर्फा सुमारे १ ते दीड किलोमीटर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या़.कोल्हापूर-पणजी, पुणे-पणजी यासारख्या लांबपल्ल्याच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या़. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विश्वजीत परब, अनमोल रावराणे यांच्यासह पोलिसांचे पथक कार्यरत होते. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग