शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय 'सी एम चषक' स्पर्धेचा शानदार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:49 IST

सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव अर्थात 'सी एम चषक' स्पर्धेचा ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय 'सी एम चषक' स्पर्धेचा शानदार शुभारंभआ. लाड , आ. डावखरे यांनी प्रज्वलीत केली क्रीडाज्योत

सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव अर्थात 'सी एम चषक' स्पर्धेचा भव्य शुभारंभ शानदार पद्धतीत व उत्साही वातावरणात सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडासंकुल येथे संपन्न झाला. भाजपचे आ. प्रसाद लाड व आ निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थित झाला प्रारंभ झाला.  आ. लाड , आ. डावखरे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलीत केली.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, प्रदेश उपाध्यक्ष निलेश नार्वेकर, भाजपच्या प्रदेश कार्यालयातील कार्यालयीन मंत्री शरद चव्हाण, माजी आमदार राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, नेते अतुल रावराणे, नेते संदेश पारकर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत प्रभारी राजू राऊळ, अनंतराज पाटकर रश्मी लुडबे, स्नेहा तेंडूलकर तसेच जिल्हा पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, क्रीडा स्पर्धासाठी जिल्हा क्रीडा संकुल मैदान भाजपने स्वखर्चातुन सुसज्ज केले आहे. शुभारंभ झाल्यानंतर दिवसभर १०० मी व ४०० मी धावणे, खो-खो, कुस्ती, कॅरम आणि फुटबॉल या स्पर्धा सुरु होणार आहेत.

कॅरम स्पर्धा - १५ व १६ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- बॅडमिंटन हाल, क्रीडा संकुल ओरोस, कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) - १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- स्वातंत्र्य स्मारक हॉल, क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी, फुटबाल स्पर्धा- १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- डॉन बॉस्को हायस्कूल मैदान, सिंधुदुर्गनगरी, १०० मी व ४००मी.धावणे स्पर्धा - १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल मैदान, सिंधुदुर्गनगरी , खो खो (महिला / पुरुष) स्पर्धा - १५ रोजी सकाळी ९ वा. स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल मैदान, सिंधुदुर्गनगरी या वेळेत वरील स्पर्धा होणार आहेत.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग