शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:19 IST

gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आह. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात रहिले आहेत. त्यामुळे २२६ प्रभागात अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून रंगू लागली आहे. ७० ग्रामपंचायतींच्या ६०० सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागांसाठी १५५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

यातील १५ अर्ज छाननीच्या वेळी अवैध ठरले होते तर १५३५ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ४ जानेवारीला तब्बल ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ६०० जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या ४९४ जागांसाठी आता प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. यात १०८७ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.त्यात देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १८९ जागांसाठी ४०४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेण्यात आले असून ३०७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या ११९ जागांसाठी ३८२ अर्ज पात्र होते. त्यापैकी ११७ अर्ज मागे घेण्यात आले असून २६५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या १०३ जागांसाठी २३४ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ५५ अर्ज मागे घेतले असून १४२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या ५४ जागांसाठी १३७ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २८ अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी २०८ अर्ज पात्र ठरले होते. ४० अर्ज मागे घेण्यात आले असून १०५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २१ जागांसाठी ४९ अर्ज पात्र ठरले होते. १७ अर्ज मागे घेण्यात आले असून २१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या १८ जागांसाठी ५५ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ६ अर्ज मागे घेतले असून ४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या २५ जागांसाठी ६६ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी २४ अर्ज मागे घेण्यात आले असून ३४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी १५३५ अर्ज पात्र ठरले. ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १०८७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.६०० सदस्य जागांपैकी १०६ जागा बिनविरोध झाल्या असल्याने आता ४९४ जागांसाठी १०८७ उमेदवारांचे भवितव्य १५ जानेवारी रोजी सिलबंद होणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी या निवडणुकीत दुरंगी व तिरंगी लढत निश्चित झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी जरी लढत असली तरी खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप अशीच दुरंगी लढत होणार असल्याचे दिसते.१०६ जागाबिनविरोधजिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०० जागांसाठी निवडणूक होत असून यातील १०६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक देवगड आणि वैभववाडी तालुक्यात बिनविरोध झाल्या आहेत. त्यात देवगड ४२, वैभववाडी ३७, मालवण ४, कुडाळ ४, कणकवली ११ तर दोडामार्ग तालुक्यातील ८ जागांचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग