शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने आता आमचा अंत बघू नये

By admin | Updated: October 16, 2015 00:49 IST

महेंद्र नाटेकर : सोनवडे घाटमार्गासाठी धरणे आंदोलन

कणकवली : सोनवडे घाटमार्ग व्हावा यासाठी गेल्या ३७ वर्षाहून अधिक काळ आंदोलने केली जात आहेत. तरीही हा घाटमार्ग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, या घाटमार्गाबाबत कोणीही जनतेची दिशाभूल करु नये तसेच श्रेयही घेऊ नये. शासनाने आता आमचा अंत बघू नये. येत्या वर्षभरात या घाटमार्गाचे काम मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन उभारावे लागेल आणि त्याची सर्वतोपरी जबाबदारी शासनावर राहिल, असा इशारा सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा जोडणाऱ्या सोनवडे घाटमार्गाचे काम गतिमान व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घाटमार्ग संघर्ष समितीचे परब, शिवाजी देसाई, सुरेश पाटकर, वाय. जी. राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कोल्हापूर शिवडाव येथील एन. के. कांबळे, लहू कुडतरकर, शिवसेना आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवा सेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, उपस्थित होते. संघर्ष समितीने मागणी केल्यानंतर शासनाने पणदूर - घोटगे - सोनवडे गारगोटीपर्यंतचा महामार्ग जाहीर केला. महामार्ग जाहीर केल्यानंतर मधला मार्ग शासनाने करणे आवश्यक होते. पण त्यानंतर उपोषणे, धरणे, रस्ता रोको आंदोलने संघर्ष समितीने केल्यावर घाटमार्गाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. दोन किलोमीटर रस्ता झाला. परंतु, अजून पूर्ण काम झालेले नाही. ५.१५ किलोमीटर रस्ता वनजमिनीतून जातो. गेली २५ वर्षे चर्चा करून या जमिनीला पर्यायी जमीन देण्याचा निर्णय झाला. परंतु, वन्यजीव संरक्षणासाठी पर्यायी मार्ग मिळाला नाही. तसेच १0 किलोमीटरवर राधानगरी अभयारण्य असल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)वैभव नाईक : प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशीलगेल्या वर्षभराच्या कालावधीत सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाने या मार्गाला मंजुरी दिली होती. मात्र, कायद्यात बदल झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर वन्यजीव विभागाने अहवाल दिला की, घाटमार्गाची गरज नाही. फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता केंद्रीयस्तरावर घेतला जाणार आहे. खासदार विनायक राऊत व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.कार्यकारी अभियंत्याना निवेदनसोनवडे घाटमार्गाबाबत शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक यांची भेट घेत निवेदन दिले. या आंदोलनाच्या ठिकाणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.वातावरण भारावलेसोनवडे घाटमार्गाच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग वासियांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवडावसह अन्य गावातील ग्रामस्थ आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण वातावरण दुमदुमुन सोडले.