शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकाऱ्यांना चकवा, जप्त केलेले डंपर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:47 IST

अनधिकृत खडी वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला असता डंपर रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. चालकानेच हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करीत नायब तहसीलदार यांनी चालकाविरोधात शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देशासकीय अधिकाऱ्यांना चकवा, जप्त केलेले डंपर पळविले दोन्ही चालकांवर तक्रार दाखल

दोडामार्ग : अनधिकृत खडी वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला असता डंपर रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. चालकानेच हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करीत नायब तहसीलदार यांनी चालकाविरोधात शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.झरेबांबर येथे दुसऱ्या डंपरवर कारवाई करून तहसीलदार कार्यालयात आणतेवेळी शासकीय कर्मचाऱ्यांना न जुमानता वाटेतूनच डंपर पळवून नेल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल साटेली भेडशी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत यांनी चालकाविरोधात तक्रार नोंदविली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील काही ठिकाणी खडी उत्खननला सद्यस्थितीत स्थगिती देण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी खडी क्रशर विरोधात तळेखोलवासीयांनी उपोषण छेडले होते. त्या अनुषंगाने तालुक्यात खडी उत्खननाला स्थगिती देण्यात आली. मात्र, काळ््या दगडाची अनधिकृत वाहतूक अद्यापही सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दोडामार्ग बाजारपेठ येथे गणेश मंदिरजवळ बेकायदा खडी वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई करून डंपर तहसीलदार कार्यालयाच्या शासकीय जागेत घेऊन ठेवण्यात आला. मात्र, जप्त करण्यात आलेला डंपर रातोरात त्या शासकीय जागेतून चोरुन नेल्याची घटना घडली.

नायब तहसीलदार तसेच कर्मचारी आले असता डंपर जागी नसल्याने ही घटना उघडकीस आली. चालकांनी हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त करत नायब तहसीलदार एन. एन. देसाई यांनी चालकाविरोधात डंपर चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.अशीच कारवाई शुक्रवारी झरेबांबर येथे अनधिकृत खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर करण्यात आली. जागीच पंचनामा करून डंपर तहसीलदार कार्यालयाकडे आणत असता चालकाने शासकीय कर्मचारी कोतवाल यांना डंपरमधून वाटेतच उतरविले व शिवीगाळ करून तेथून डंपर घेऊन पसार झाला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी याही डंपर चालकाविरोधात साटेली भेडशी मंडळ अधिकारी सावंत यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावरबेकायदेशीर बेदरकारपणे खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्याबाबत पंच यादीही घातली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना न जुमानणाऱ्या डंपर चालकांनी चकवा देत थेट तहसीलदार कार्यालयातूनच रातोरात डंपर घेऊन पलायन केले. यावरून तहसीलदार कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला असून तालुक्यावर किती धाक आहे, हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग