शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर

By अनंत खं.जाधव | Updated: November 6, 2022 20:19 IST

आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार

सावंतवाडी : जोपर्यंत सरकारकडे बहुमत आहे, तो पर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालय ही विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवूनच निर्णय घेईल यांची आपणास आशा आहे. त्यामुळे अपात्र आमदाराचा निर्णय विधानसभेतच होईल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष नार्वेकर हे सावंतवाडीतील आपल्या घरी खाजगी दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके,तहसिलदार श्रीधर पाटील,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,मुख्याधिकारी जयंत जावडेकर उपस्थित होते.

अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा आहे.पण या जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास झाला पाहिजे येथील किनार्‍यावर सोयी सुविधा निर्माण होण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.तसेच ज्या जमिनी वर्षोनुवर्षे उद्योजकांना दिल्या आहेत पण तेथे उद्योग उभारण्यात आले नाहीत या जमिनी बाबत सरकार ने कोणातरी निर्णय घेतला पाहिजे कारण सर्व सामान्य जनतेच्या जमिनी या विकास कामासाठी दिल्या आहेत मग त्या जमिनी तशाच ठेवणे योग्य नाही.त्या जमिनीवर उद्योग धंदे आले पाहिजेत असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

याबाबत मी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री याच्या उपस्थित बैठक घेणार असून,त्याबाबत ची माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना पाठवण्यास सागितली असल्याचे ही नार्वेकर यांनी सांगितले.सध्या महाराष्ट्रात सरकार लवकरच पडणार अशी चर्चा सुरू आहे.यावर ही त्यांनी भाष्य करतना जी चर्चा विधानसभा आवारात होते.ती खरी असते बाहेर कोण काय बोलतात त्याला अर्थ नसतो.असे सांगत सरकार कडे विधानसभेत जो पर्यत बहुमत आहे.तो पर्यत सरकारला कोणताही धोका नसल्याचे ही नार्वेकर यांनी सांगितले.

आमदार अपात्रे बाबत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे.त्याबाबत नार्वेकर म्हणाले आमदार अपात्रतेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात होणार नाही.तो निर्णय विधानसभेतच होईल  कारण प्रत्येक व्यवस्थेने कोणते निर्णय घ्याचे हे ठरलेले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय हा न्यायालयात होणार नसल्याचा विश्वास मला आहे.असे ही नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना