शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:08 IST

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.

ठळक मुद्देशासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप प्रत्यक्ष पाहणीत आढळले कीड लागलेले धान्य

कणकवली : कलमठ येथे सुरू असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चुकीच्या पद्धतीने हरकुळ बुद्रुक येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार वसतिगृहाचे अधीक्षक व कर्मचारी करीत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत समोर आली आहे.

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहाच्या पाहणीनंतर कणकवली पंचायत समितीच्या सभापती दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, शामसुंदर दळवी, पंचायत समिती अधीक्षक अनिल चव्हाण, पालकर व अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.दिलीप तळेकर म्हणाले, कणकवली पंचायत समिती सदस्य गणेश तांबे यांनी या शासकीय वसतिगृहातील समस्येबाबत माहिती मागविली होती. त्याबाबत त्यांना अधीक्षकांनी दिलेली माहिती खरी आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अचानक गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांना घेऊन वसतिगृहाला भेट दिली. या भेटीत वसतिगृह अधीक्षक यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली.या वसतिगृहात सहा कर्मचारी असून त्यापैकी १ कर्मचारी सुट्टीवर होता. तर चार कर्मचारी हजेरीपटावर सही करून गायब होते. फक्त वसतिगृह अधीक्षक एस. पी. जाधव उपस्थित होते. संबंधित वसतिगृहाच्या सर्व रजिस्टरची तपासणी केली असता, गेले २० ते २५ दिवस एकाही रजिस्टरमध्ये माहिती भरण्यात आलेली नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता अधिक्षकांनी उद्धट उत्तरे दिली.वसतिगृहाची आम्ही पाहणी केली. तेव्हा गंजलेल्या अवस्थेत कॉट व फाटलेल्या बेडशिट आढळून आल्या. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उशा खराब झालेल्या होत्या. वसतिगृहाच्या वरील मजल्यावरील शौचालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना खालील मजल्यावर जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.

पोषण आहार खोलीतील चणाडाळ, गहू, तांदूळ या आहाराला कीड लागली होती. हजेरीपटावर ३४ मुले असताना केवळ सात ते आठ मुले हजर होती. तर १७ मुले गैरहजर असल्याचे अधिक्षकांनी सांगितले. संगणक कक्ष बंदावस्थेत होता. वाचनालयही बंद होते़.त्यामुळे कणकवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर हे नवे वसतिगृह करण्यामागचे कारण काय? कोणाचीही परवानगी न घेता हे स्थलांतर करण्यात आले. वसतिगृहाचे अधीक्षक त्याठिकाणी न राहता ते कणकवलीत राहत आहेत.

या वसतिगृहाचे भाडे किती देता? असे विचारले असता त्याबाबत माहिती सांगण्यास अधिक्षकांनी टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांचे जेवण स्वयंपाकगृहामध्ये न ठेवता ते हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व बाबींचा विचार करता सर्व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत असून मुलांची हेळसांड करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग