शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Government employees strike: शिक्षक संपावर असतानाही सिंधुदुर्गातील वागदेवासीयांनी सुरू केल्या शाळा!

By सुधीर राणे | Updated: March 20, 2023 16:20 IST

गावातील डी.एड. झालेल्या महिला मुलांना शैक्षणिक धडे देत आहेत

सिंधुदुर्ग: शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मुलांसाठी आज पासून खुल्या झाल्या. तेथील विनसम क्रीडा मंडळ, स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती व वागदे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने सोमवार पासून या शाळा सुरू झाल्या. टप्याटप्याने गावातील सर्व शाळा सुरू करणार असल्याचे सरपंच संदीप सावंत व विनसम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी सांगितले.शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ७.३० ते ११ या वेळेत शाळा भरवण्यात आली. ४० पटसंख्या असलेल्या आर्यादुर्गा शाळेत  २५ मुलांनी उपस्थिती दर्शवली. शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने आनंद होत असल्याचे पालकांनी सांगितले.सरपंच संदीप सावंत म्हणाले, संपाला आमचा विरोध नाही. परंतु संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून गावातील दोन शाळा सुरू केल्या आहेत. टप्याटप्याने उर्वरित तिन्ही शाळा सुरू करण्याचा मानस आहे. गावातील डी.एड. झालेल्या महिला मुलांना शैक्षणिक धडे देत आहेत. जिल्ह्यात प्रत्येकाने असा पुढाकार घेऊन शाळा सुरू कराव्यात असे आवाहन संदीप सावंत व अनिल चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय घाडीगावकर, विनसमचे सचिव बबलू परब, गिरीश परब, ग्रामस्थ संजना घाडीगावकर, उर्मिला घाडीगावकर, आरती घाडीगावकर, दीपा सावंत, डी.एड. शिक्षक विनया परब, पूजा चव्हाण, रचना परब, अंगणवाडी सेविका पुष्पांजली कदम, मदतनीस अर्चना तेंडोलकर उपस्थित होत्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षक