शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारती झाडीत हरवल्या, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 17:43 IST

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे ...

ठळक मुद्देछपरांना गळती, जनतेमधून नाराजीचा सूरसिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तअधिकारी दौरे करण्यात मग्न

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र मुख्यालयातील परिसरात दिसत आहे.

दरम्यान, अनेक शासकीय कामांसाठी जिल्ह्यातील लोक येथे येत असतात. मात्र, या ठिकाणची परिस्थिती पाहून जनतेतूनच नाराजीचे सूर उमटत आहेत. शासकीय यंत्रणेची ही बिकट परिस्थिती असेल तर इतर कार्यालयांची काय अवस्था असणार असे सूर उमटत आहेत.

या सर्व समस्यांचा उल्लेख नियोजन समितीच्या बैठकीत केला जातो. मात्र, या इमारतींना २५ वर्षे पूर्ण होत असून इमारतींची डागडुजी कोण करणार? हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी झाडींचे साम्राज्य पसरले आहे तर इमारतींच्या आत स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत.

अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नळ नाहीत, दरवाजे बंद अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ही शौचालये दोऱ्यांनी बंद करून ठेवलेली पहावयास मिळत आहेत.अधिकारी दौरे करण्यात मग्नयेथील जिल्हा प्रशासकीय अधिकारी व निवासी अधिकारी यांचे लक्ष मात्र आपण काम करीत असलेल्या प्रशासकीय इमारतींकडे नसून बाहेरचा दौरा करण्यात ते मग्न असतात. एखादा अधिकारी इमारतींच्या आवारात महिन्यातून एक दिवस भेट देऊन या सर्व प्रकारांची पहाणी करेल अशी आशा जनता करीत आहे.

जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तप्रशासनाच्या नियोजन समिती सभेत यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीला आवाज उठविण्याचे धाडस होत नाही. सामान्य जनतेला मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर या परिसरातील व मुख्य रस्त्यांवरील पथदीप बंद असतात. रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना अंधारातून घरी जावे लागते.

कोणत्याही सोयी सुविधा नसल्यामुळे फक्त जिल्ह्याची मुख्य राजधानी म्हणून नावारूपाला आलेली सिंधुदुर्गनगरी असे मोठ्या दिमाखात याठिकाणी ही वास्तू उभी आहे. याकडे पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे अशी शासकीय कामानिमित्त येणाऱ्या  जनतेची मागणी आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार