शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

कोकणातील मासळीवरील आयातबंदी गोवा सरकारने त्वरित उठवावी : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 17:26 IST

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील मासळीवर गोवा राज्याने पूर्णत: बंदी घातली आहे. याबाबतचे निर्बंध हटवून ही बंदी गोवा राज्य सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली. 

ठळक मुद्देकोकणातील मासळीवरील आयातबंदी गोवा सरकारने त्वरित उठवावी : गिरीश बापटवाहनधारकांकडे अन्न भेसळचे प्रमाणपत्र आणि मासळी वाहतूक परवाना हवा, या निर्बंधांचा समावेश होता. 

 

सिंधुदुर्ग :  कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील मासळीवर गोवा राज्याने पूर्णत: बंदी घातली आहे. याबाबतचे निर्बंध हटवून ही बंदी गोवा राज्य सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली.  गोवा बंदीनंतर रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांची झालेली मत्स्यकोंडी शासनस्तरावर सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी गुरुवारी मंत्रालयात मंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली समस्या सोडविण्यासाठी संबंधितांची बैठक झाली. 

काही दिवसांपूर्वी गोवा राज्यात दक्षिणेकडील राज्यातून आयात केलेल्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळून आले. त्यामुळे ही मासळी खाणाºयांना विषबाधा झाली होती. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने तेथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना केल्या. गोवा राज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून आयात होणाºया मासळी वाहतुकीवर १ नोव्हेंबरपासून प्रथम काही निर्बंध आणले. त्यामध्ये मासळी इन्सुलेटेड वाहनांमधूनच गोव्यात आणावी तसेच वाहनधारकांकडे अन्न भेसळचे प्रमाणपत्र आणि मासळी वाहतूक परवाना हवा, या निर्बंधांचा समावेश होता. 

गोवा सरकारच्या या निर्बंधांना दोन्ही जिल्ह्यांमधून कडाडून विरोध झाला. गोव्याची वाहनेही या जिल्ह्यांमधून जातात. त्यामुळे गोवा सरकारला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मात्र गोवा सरकारने अन्य राज्यांतील मासळी गोव्यात आणण्यावर बंदी घातली. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना मत्स्यकोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले व कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे. पर्यायी मासळी बाजारपेठांचा शोध येथील मासळी व्यावसायिकांना घ्यावा लागत आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे मत्स्य वाहतूकदारांसाठी विशेष मोहीम राबवून परवाने देण्यात आले आहेत. या संदर्भात गुरुवारी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली. 

या बैठकीला गृहराज्यमंत्री तथा  सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, मत्स्य व्यवसाय आयुक्त विकास अरुण विधळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त  पवार, कोकण विभागाचे सहआयुक्त देसाई उपस्थित होते. या बैठकीत गोवा राज्यात महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ जाऊन या संदर्भात तेथील अन्न व औषध प्रशासनास निवेदन दिले जाणार आहे. तसेच यासंदर्भात सर्व माहिती गोवा सरकारला दिली जाणार आहे. गोवा बंदी बेकायदा?मत्स्य व्यवसाय व वाहतुकीबाबत केंद्रीय कायद्यात गोवा सरकारने  घातलेल्या कोणत्याही निर्बंधांचा उल्लेख नाही. तशी कोणतीही तरतूद नसून फक्त तापमान नियंत्रणाची तरतूद आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात मासळी आणण्यासाठी १० ते १५ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे गोव्यापासून २ ते साडेतीन तासांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे ताजे मासे गोव्यात सहजपणे पोहोचतात. ही वस्तुस्थिती पाहता मासळी  वाहतुकीकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गवरील वातानुकूलित वाहनांबाबतचे हे निर्बंध त्वरित दूर करावेत, असे मत या बैठकीत मांडण्यात आले 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटsindhudurgसिंधुदुर्ग