शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली चमकणारी अळंबी, महाराष्ट्रात प्रथमच नोंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 14, 2024 13:57 IST

चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये झाली

रामचंद्र कुडाळकरतळवडे : सिंधुदुर्ग जिल्हा हि निसर्ग संपन्न भूमी आहे. या भूमीत वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य लपलेले आहे. येथे ठिकठिकाणी जैवविविधता आढळते. जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात सापडलेली बायोलूमिनिकस मशरूम म्हणजेच चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये झाली आहे.या आधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात आणि सिंधुदुर्ग मधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे. परंतु होडावडे गावांत सापडलेल्या चमकणाऱ्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.या चमकणाऱ्या अळंबीचे नाव मायसेना क्लोरोफॉस असून या अळंबीची नोंद २६ एप्रिल २०२४ ला जनरल ऑफ थ्रेडेंट टेक्सा नियतकालिकेत प्रसिद्धी झाली आहे. या संशोधनासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजचे संशोधक प्राध्यापक डॉ. योगेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मंगेश माणगावकर यांनी सांगितले .

महाराष्ट्रात प्रथमच नोंदमहाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावच्या नावलौकरीरात भर पडली आहे. तसेच अभ्यासकांना पर्यावरण प्रेमींसाठी या अळंबीच्या अभ्यासाची संधी मिळाली आहे .

मंगेश माणगावकर यांची विविधांगी परसबागया अळंबी बरोबरच मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या बागेत आढळलेली विविध पक्षी, फुलपाखरे, साप,आणि बेडकाच्या जातीची नोंद केल्या असून त्यांच्या बागेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गResearchसंशोधन