शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या : डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:12 IST

बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देकृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्याआमदार निरंजन डावखरे यांची मागणी

सिंधुदुर्ग : बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार निरंजन डावखरे यांनी धरला आहे. त्यावर अपर मुख्य सचिव डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) 23 ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 26-8-2019 च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचधर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा.

या संदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असे डावखरे यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गHSC Exam Resultबारावी निकाल