शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्याला " विशेष पर्यटन पॅकेज " द्या ! संदेश पारकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:35 IST

tourism sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज द्या अशी मागणी कोकण सिंचन महामहामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेवून केली. त्यांना त्याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्याला " विशेष पर्यटन पॅकेज " द्या ! संदेश पारकर यांची मागणीपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज द्या अशी मागणी कोकण सिंचन महामहामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेवून केली. त्यांना त्याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले.या निवेदनात म्हटले आहे की , सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकरित्या गोव्यापेक्षाही सुंदर असून येथील किल्ले , समुद्रकिनारे , आंबोलीसारखे हिलस्टेशन , अभयारण्य , विविध धबधबे , मासे , फळे , पारंपारिक कला , लाकडी खेळणी , मालवणी संस्कृती व भाषा हि जिल्ह्याची ओळख आणि संपत्ती आहे .

सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि येथे जास्तीतजास्त पर्यटक यावेत यासाठी समुद्र किनाऱ्यांवरील काही नियम व अटी शिथिल करणे आवश्यक आहे .

दरम्यान, जिल्ह्यातील संस्कृती जपण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने पर्यटनपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन ठाकरे यांनी पारकर यांना दिले . आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढीच्या दृष्टीने देखील पारकर यांची यावेळी सविस्तर चर्चा केली 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेSandesh Parkarसंदेश पारकरtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग