सावंतवाडी : शिवरामभाऊ जाधव यांना अभिप्रेत असे काम विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत करत आहेत. त्यामुळे ही बँक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख टिकवून आहे. चांदा ते बांदा योजनेतून समृध्दी आली तेव्हा या योेजनेला जिल्हा बँकेचा हातभार लागला असता तर योजना आणखी यशस्वी झाली असती. मात्र आता ही योजना बदलून सिंधुरत्न या नावाने पुढे येत आहे. पण ही योजनेचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा यासाठी माझा आग्रह कायम राहणार असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मांडले.ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समृध्दी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सहकार निबंधक कृष्णकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्या सुनंदा राऊळ, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, एम. के. गावडे, प्रभाकर देसाई, प्रज्ञा परब, दत्ताराम कोळमेकर, माडखोल सरपंच संजय शिरसाट आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून काम करूया. दुध उत्पादक गट वाढले पाहिजे, यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करूया, हा प्रकल्प सुरू करत असताना मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्यात आले, पण आम्ही हे गैरसमज दूर केले. यावेळी एम. के. गावडे, प्रभाकर देसाई, कृष्णकांत धुळप आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक अनिरूध्द देसाई यांनी केले.कर्ज गायी खरेदीसाठी दिले पाहिजे होतेमाजी मंत्री दीपक केसरकर यांनी बोलण्याच्या ओघात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना चिमटा काढला. तुम्ही राजकीय पक्षांना गाड्यासाठी कर्ज देण्यापेक्षा गायी खरेदीसाठी कर्ज दिले असते तर ते वेळेत मिळाले असते, असे सांगत सावंत यांची फिरकी घेतली. सावंत हे सर्वात यशस्वी अध्यक्ष आहेत. भविष्यात त्यांनी आमदार झाले तरी अध्यक्षपद कायम ठेवावे, असेही केसरकर म्हणाले.
सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 11:45 IST
Deepak Kesarkar Sindhudurg- चांदा ते बांदा योजनेतून समृध्दी आली तेव्हा या योेजनेला जिल्हा बँकेचा हातभार लागला असता तर योजना आणखी यशस्वी झाली असती. मात्र आता ही योजना बदलून सिंधुरत्न या नावाने पुढे येत आहे. योजनेचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा यासाठी माझा आग्रह कायम राहणार असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मांडले.
सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही
ठळक मुद्देसिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्राला द्या, दीपक केसरकर आग्रही माडखोल दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन