शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याप्रमाणेच शिथिलता द्या : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष- प्रमोद जठार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:12 IST

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत.

ठळक मुद्देअशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

कणकवली : गोवा सरकारप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा राज्याने ज्याप्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली, त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्गात शेतकरी, मजूर यांना आता अवघा महिना बेगमीच्या कामांसाठी शिल्लक राहिला असून या महिन्याभरात पावसाळ्याची पूर्वतयारी व बेगमीचा बाजार करण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांचे आपण लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्गबाहेर असलेल्या जिल्हावासीयांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा.

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. शेतक-यांना पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्यांची दुकाने सुरू न ठेवल्यास शेतकºयांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.

अनेकांची घरे अर्थवट स्थितीत आहेत. पावसाळ्यातील लाकडे साठा करून ठेवण्यासाठी गावात मजूर उपलब्ध होत नाहीत. संचारबंदी असल्याने मजूर कामाला जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गातील दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरीलजीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह घराचे बांधकाम, छपराचे काम, पत्रे, प्लास्टिक, ताडपत्री अशा अनेक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. बेगमीच्या बाजारासाठी किराणा व त्या अनुषंगाने दुकाने दिवसभर सुरु ठेवून जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गात सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले होते. त्याचा फटका लॉकडाऊन काटेकोर पाळणा-या सिंधुदुर्गवासीयांना बसता नये. या दृष्टीने काळजी घेण्याची मागणीही प्रमोद जठार यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या