शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विकासकामात जिल्ह्याला न्याय देणार

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

रवींद्र वायकर : शिवसेनेतर्फे नूतन पालकमंत्र्यांचा रत्नागिरीत सत्कार

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर सोपवली आहे. जिल्ह्यात विकास करायला भरपूर वाव आहे. त्यासाठी मुंबईत ज्या व्हिजनने आपण काम केले, त्याच व्हिजनने जिल्ह्यातही विकासाची कामे केली जातील. कोणती कामे करायला हवीत, हे लोकांनी सांगण्यापेक्षा लोकांना कोणती कामे हवी आहेत, हे मला समजले पाहिजे तरच मी या जिल्ह्याला न्याय देऊ शकेन, असे उद्गार रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना काढले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पालकमंत्री वायकर यांचा सत्कार समारंभ व शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर वायकर हे प्रथमच रत्नागिरीत आले आहेत. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रमोद शेरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री वायकर यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.वायकर म्हणाले की, खेडमध्ये आपले घर असून, गेली ३० वर्षे मुंबईत राहूनही मी सातत्याने गावात येत होतो. मुंबईपेक्षा गावावर माझे प्रेम आहे. त्याहीपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाने मला खूप काही दिलंय. मुंबई- जोगेश्वरीतून राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर महत्त्वाच्या अनेक पदांवर काम केले. मुुंबई महापालिकेत स्थायी समिती सभापती असताना मुंबईच्या पाण्याच्या समस्येची उकल केली. रत्नागिरी जिल्ह्यातही कोयनेचे अवजल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीत मिळाल्यानंतर समुद्रात जाते. या पाण्याचा चिपळूण परिसरासाठी उपयोग व्हावा, असे आपले प्रयत्न राहणार आहेत.पालकमंत्री म्हणून माझ्याकडून जिल्हावासीयांच्या खूप अपेक्षा असणार हे साहजिक आहे. त्यामुळेच यापुढे जिल्ह्यात आल्यावर नाले, रस्ते, गटारे हे सिमेंट काँक्रिटचे झालेले दिसले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शहरांचा विकास महत्त्वाचा आहेच, गावांचाही विकास तितक्याच जोरकसपणे करणे आवश्यक आहे. शहर आणि गावांमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण व्हायला हवी, त्यावर आपला भर राहील. तसेच दूषित पाणी समुद्राला जाऊन मिळणे योग्य नाही, अशा पाण्यावर प्रक्रिया आवश्यक आहे.शास्त्रज्ञांच्या एका कार्यक्रमात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली. अनेक शास्त्रज्ञ पीएचडी घेतलेले लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. केवळ शास्त्रज्ञ झाल्याने काम संपत नाही, तर शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. दापोली कृषी विद्यापीठ जिल्ह्यात आहे. येथे अनेक वैज्ञानिक आहेत, कृषितज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केलं की, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात भर पडली. येथे भाताचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं? हापूसमधील साका या समस्येबाबत संशोधन करुन समस्या सोडविली का? शास्त्रज्ञ हा केवळ विद्यापीठ व संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहे म्हणून सांगण्यापुरता असता कामा नये, तर तो शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचला पाहिजे. (प्रतिनिधी)सर्व पक्षांतील राजकीय लोकांनी कोकणच्या विकासासाठी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. राजकारणासाठी फक्त निवडणुकीचा एक दिवस राखून ठेवावा. अन्यवेळी केवळ जिल्ह्याच्या विकासाचाच विचार प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही करायला हवा. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असे वायकर म्हणाले. यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि सचिन कदम यांनी आपले विचार मांडले.उपयोग हवा...जिल्ह्यात पायाभूत सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण पालकमंत्री म्हणून प्रयत्नशील राहणार आहोत. महामार्गावर ट्रामा केअर सेंटर्स सुरु झाली. पण, त्याचे काम खरोखरच योग्य पद्धतीने चालते का? तेथे रुग्णवाहिका किती आहेत. डॉक्टर्स उपलब्ध असतात की नाही, याकडे यापुढे सर्वांनीच काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. या यंत्रणा शोभेच्या नाहीत तर त्याचा जनतेला उपयोग व्हायला हवा, असे वायकर म्हणाले.