शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोकणातील काजू बी'ला हमीभाव द्या, प्रमोद जठारांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी

By सुधीर राणे | Updated: January 31, 2024 13:52 IST

कणकवली: कोकणातील काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव किंवा अनुदान मिळावे. या मागणीसाठी मंगळवारी भाजप ...

कणकवली: कोकणातील काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव किंवा अनुदान मिळावे. या मागणीसाठी मंगळवारी भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबई येथील मंत्रालयात अर्थमंत्री अजित पवार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेवून निवेदन  दिले. यावेळी अर्थमंत्र्यांनी तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणल्यास आपण निधी द्यायला तयार आहे, असे सांगितले. ही बाब प्रमोद जठार यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. त्यावेळी येत्या ३ फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक बोलावून हा विषय मार्गी लावूया असे आश्वासन त्यांनी दिले. जठार यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की,  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणशी संबंधित भागात काजूचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. काही गावातून पूर्वजांनी लागवड केलेल्या काजूचे उत्पादन घेत आजही अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करत आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठाच्या नवनवीन संशोधनातून काजूच्या नवनवीन जाती निर्माण होत आहेत. त्याच्या लागवडीमुळे काजूच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

परंतू दुर्दैवाने आजपर्यंत काजू बीला महाराष्ट्र सरकारने हमीभाव ठरवून दिला नाही. गोवा सरकारने काजू बीला १५० रुपये किलोचा हमीभाव जाहिर केला आहे. कोकणातील काजू बीच्या दरात दरवर्षीप्रमाणे अस्थिरता असल्याने बागायतदार, शेतकरी आर्थिक संकटात आहेत. काजू व्यापारी जो योग्य वाटेल त्या दरात काजू खरेदी करतात.महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर काजू बीच्या दर निश्चितीबद्दल अभ्यास झाला तेव्हा कोकण कृषी विद्यापीठाने १२९ रुपये इतका खर्च काजू उत्पादनासाठी होतो असा अहवाल सरकारला सादर केला. तसेच स्वामीनाथन शिफारसीमध्ये १९३ रुपये  काजू उत्पादनाचा खर्च सांगण्यात आला आहे. या सगळ्याचा विचार करता कोकणातील काजू उत्पादक शेतकर्‍यांना काजू उत्पादनासाठी २०० रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा असे म्हटले आहे.दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र लिहून याविषयावर सकारात्मक कार्यवाहीसाठी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी असे सांगितल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAjit Pawarअजित पवार