शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चाकूहल्ला प्रकरणातील युवती अद्यापही गंभीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:54 IST

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन युवतीवर बांबुळी-गोवा येथे रविवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अद्यापही तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

ठळक मुद्देचाकूहल्ला प्रकरणातील युवती अद्यापही गंभीरचदोडामार्ग येथील घटना : प्रियकरावर अंत्यसंस्कार

दोडामार्ग : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या गैरसमजातून प्रेयसीच्या अंगावर धारदार चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच चाकूने स्वत:वर वार करून आत्महत्या करणारा प्रियकर गोकुळदास रावजी काळकेकर (२५) याच्यावर सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात वझरे-काळकेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन युवतीवर बांबुळी-गोवा येथे रविवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अद्यापही तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.वझरे-काळकेकरवाडी येथे एखाद्या चित्रपटात शोभेल अशी थरारक घटना प्रेमप्रकरणात झालेल्या गैरसमजातून रविवारी सायंकाळी घडली आणि संपूर्ण तालुका सुन्न झाला. रविवारी दुपारी गावातीलच एका लग्नसोहळ््याला हे प्रेमीयुगुल जाऊन आले आणि त्यानंतर गैरसमजातून दोघात बाचाबाचीचा प्रकार घडला. हाच राग मनात ठेवून गोकुळदास काळकेकर होता. तो आपल्या प्रेयसीला माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही या इराद्याने अद्दल घडविण्याची वाट पाहू लागला.सायंकाळी संबंधित अल्पवयीन युवती सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली असता आधीच संधीची वाट पाहत असलेला गोकुळदास याने विहिरीवर येऊन तिच्याशी हुज्जत घातली आणि रागाने तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.

दहा ते बारा ठिकाणी त्याने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या प्रेयसीला पाहिल्यावर गोकुळदासने स्वत:चे जीवन संपविण्याचे ठरविले. एका प्लास्टिक बाटलीतून आणलेले विषारी द्र्रव्य त्याने प्राशन केले आणि नंतर प्रेयसीवर वार करण्यासाठी आणलेल्या चाकूने स्वत:ला भोकसून घेत आत्महत्या केली.गंभीर जखमी झालेल्या त्या युवतीला अत्यवस्थ अवस्थेत प्रथम दोडामार्ग व नंतर बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी नेण्यात आले. रविवारी रात्री उशिरा तिच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक असून, तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

शस्त्रक्रियेनंतरही ती सोमवारी उशिरापर्यंत बेशुद्धावस्थेत होती. तर मृत हल्लेखोर प्रियकर गोकुळदास काळकेकर याचा मृतदेह सोमवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांकडून हल्ल्यातील साहित्य जप्तपोलिसांनी रविवारी रात्री उशिरा हल्ल्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. यात चाकू, संबंधित युवतीची घटनास्थळावर आढळलेली चप्पल, गोकुळदास याने आणलेल्या विषारी द्र्रव्याची बाटली आदी वस्तूंचा समावेश आहे.मृत प्रियकरावर गुन्हा दाखलदरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मृत हल्लेखोर प्रियकर गोकुळदास काळकेकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाडगे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग