शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 18:32 IST

Shiv Sena Kankavli Sindhudurg : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्याना शहरातील जनता कंटाळली आहे. अशा या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याचा निर्धार करा. तसेच नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा. असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.

ठळक मुद्देनगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा !संदेश पारकर यांचे आवाहन ; कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्याना शहरातील जनता कंटाळली आहे. अशा या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याचा निर्धार करा. तसेच नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा. असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.कणकवली जळकेवाडी येथील गुरव यांच्या निवासस्थानी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर,शहर प्रमुख शेखर राणे,सुजित जाधव,प्रतीक्षा साटम,मीनल म्हसकर,नगरसेविका मानसी मुंज,तेजस राणे,भिवा परब,प्रसाद अंधारी,योगेश मुंज,अमित मयेकर,दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद व दहशतीचा वापर केल्यामुळे सेनेचे ७ ते ८ उमेदवार काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. या निवडणुकीत सेनेचा पराभव झाला म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेने सोडली नाही. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खासदार, आमदार फंडातून आणला. तसेच कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांना मदत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील असून शिवसैनिकांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंच जावून सांगावी.अतुल रावराणे म्हणाले,जेव्हा जेव्हा राज्यावर नैसर्गिक संकटे येतात त्यावेळी सर्वप्रथम जनतेच्या मदतीला बाळासाहेबांचा शिवसैनिक धावून जातो. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा आरोग्य यंत्रणा कमकुवत होती. ती सक्षम करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन ती सक्षम केली आहे. कोकणाला शिवसेनेने भरभरून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक आणण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासून कामाला लागावे. यावेळी श्री भैरी भवानी प्रतिष्ठानतर्फे व संदेश पारकर यांच्यातर्फे उपस्थितांना काजू कलम, छत्री व वह्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग