शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

सर्वसाधारण सभेत खडाजंगी

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

जान्हवी सावंत यांना इशारा : राणे यांना एकेरी बोलून दाखवाच

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत यांनी बुधवारी आमदार नीतेश राणे यांचा एकेरी शब्दात उल्लेख व अन्य बेताल वक्तव्य करून सभाशास्त्राचा भंग केला. सावंत अशा प्रकारची वक्तव्य करून फक्त प्रसिद्धी मिळवत आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यापेक्षा त्यांना ओव्हरस्मार्टगिरी करण्यास जास्त रस आहे. यामुळे हिंमत असेल तर आमदार राणे यांना एकेरी बोलून दाखवाच, असा खणखणीत इशारा समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी जान्हवी सावंत यांना दिला आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत सदस्य जान्हवी सावंत यांनी जिल्हा परिषद वसाहत दुरूस्तीसंदर्भात बोलत असताना नीतेश राणे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तर तुम्हाला खाल्या मिठाची जाण नाही, अशाही प्रकारचे वक्तव्य केले होते. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली होती. या वक्तव्याचा सभापती अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला.सभापती अंकुश जाधव म्हणाले, आमदार नीतेश राणे यांचा उल्लेख सावंत यांनी एकेरी नावाने केला. सावंत यांनी जाणीवपूर्वक हे विधान बोलले आहे. तसेच ‘खाल्या मिठाला जागलं पाहिजे’ या विधानासंदर्भात बोलताना जाधव म्हणाले, खाल्या मिठाला तुम्हाला जागलंच पाहिजे. ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाचे निष्ठेने काम केलेच पाहिजे. सावंत या शिवसेनेच्या मिठाला जागत नसल्या तरी त्या आमदार दीपक केसरकर यांच्या मिठाला जागत असल्याचा टोलाही जाधव यांनी लगावला.सावंत यांचा केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप असून अशा प्रकारची विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहत आहेत. मी पूर्वी समजायचो की सावंत या अभ्यासू सदस्या आहेत. मात्र, तसे काहीही नसून त्यांना विकासकामांपेक्षा ओव्हरस्मार्टगिरीत जास्त रस आहे. सभागृहात काय बोलावे, काय बोलू नये याबाबत सावंत यांच्यावर संस्कार नाहीत. सभाशास्त्र पायदळी तुडविण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोपही जाधव यांनी केला. यापुढे आमच्या एकाही आमदाराला एकेरी नावाने बोलाच मग कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही सावंत यांना दिला आहे. (प्रतिनिधी)