शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उपनेतेपदी गौरीशंकर खोत यांची वर्णी, कोकणात शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:42 IST

निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे.

कणकवली : शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणात शिवसेनेची पकड कायम ठेवण्यासाठी शिवसेना उपनेतेपदी कणखर नेतृत्व असलेले गौरीशंकर खोत यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे.गौरीशंकर खोत हे एकेकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय होते. राणेंच्या निवडणूक रणनीतीमध्ये विजयाची आखणी हुशारीने मांडण्याचे काम ते करायचे. कालांतराने पुन्हा खोत यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग- रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कणकवली तालुक्यातील नांदगांव विकास सोसायटीच्या निवणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवत १३ ही जागांवर विजय मिळवला होता.सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतील गौरीशंकर खोत यांच्याकडे उत्कृष्ट वक्ता, अभ्यासू वक्तृत्व, उत्तम संघटन कौशल्य, निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती असलेल्या गुणांमुळे असंख्य शिवसैनिकांचा पाठींबा आहे. आगामी निवणुकामध्ये खोत यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याची निवड जाहीर करण्यात आली आहे.सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. आगामी काळात त्यांचा शिवसेनेला त्याचा संघटनेवर परिणाम होऊ नये, यासाठी मातोश्रीवरुन सूत्र हलवण्यात येत आहेत. गौरीशंकर खोत यांची थेट उपनेते पदी निवड करत सिंधुदुर्गात निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद देण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यात येत असल्याचे चित्र या निवडीतून दिसत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना