शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांच्या कळप, नितेश राणे यांच्या ओएसडींनी कॅमेऱ्यात कैद केला; नागरिकांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:06 IST

वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाही

सावंतवाडी: सावंतवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नरेंद्र डोंगर परिसरात स्थिरावलेल्या गव्यांच्या कळपाने मंगळवारी शिरोडा नाका परिसरात आपली हजेरी लावली. दुपारी भरवस्तीत हे गवे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे गवे अगदी पाळीव म्हशी तसेच गायी जशा मुक्तपणे फिरतात तशाच प्रकारे कळपाने फिरत आहेत.दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओएसडी आणि सावंतवाडीचे तत्कालीन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा कळप कैद केला आहे. भरवस्तीत गव्यांच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात वावर झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाहीगेले अनेक दिवस या कळपाला नरेंद्र डोंगर परिसर, माठेवाडा, बाहेरचावाडा, माजगाव-मेटवाडा, मळगाव या भागांत फिरताना पाहिले गेले आहे. विशेष म्हणजे, कळप अनेक वेळा रस्ता ओलांडत असल्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे या गव्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, याबाबत सावंतवाडी वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात आलेली नाही.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • शहराच्या परिसरात आणि भरवस्तीत गवे येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे कार्यालय जवळच असून, गव्यांच्या मोठ्या प्रमाणावर वावरावर त्वरित ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
  • सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात गव्यांच्या कळपाला सागर साळुंखे यांनी कॅमेऱ्यात टिपले आहे.