शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार, २५ डिसेंबरला मुंबईत पुरस्काराचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 18:56 IST

सिंधुदुर्ग : कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार ...

सिंधुदुर्ग : कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक, महेश सरनाईक यांना यावर्षीचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण २५ डिसेंबरला मुंबई, दादर येथील शारदाश्रम शाळेत सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबईचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन २५ डिसेंबरला शारदाश्रम विद्यामंदिर दत्तमंदिर सभागृह, भवानी शंकर मार्ग, दादर पश्चिम मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे होणार आहे. समारंभाचे अध्यक्ष बेळगाव येथील संजय विद्यानंद कुळकर्णी असणार आहेत. महेश सरनाईक यांना स्व. रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर इतिहास संशोधन/साहित्य, पत्रकारिता/प्रकाशन कार्याकरीता पुरस्कार, स्व. बा. नी. देसाई आदर्श समाजसेवा पुरस्कार मुंबई सांताक्रुझ येथील शांताराम केळुसकर, स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पालघर येथील विजय वालावलकर, स्व. सुर्याजी रामकृष्ण (काका) कोचरेकर आदर्श समाजसेवक पुरस्कार कुडाळ येथील श्रीमती शैलजा शेखर सामंत यांना तर गौड ब्राह्मण सभेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार कणकवली, फोंडा येथील दत्तकुमार (सुरेश) वामन सामंत यांना जाहीर झाला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग