राजापूर : निसर्गाचा चमत्कार मानल्या जाणाऱ्या राजापूरच्या गंगामाईचा क्षीण झालेला प्रवाह आज, बुधवारी पहाटेपासून पुन्हा वाढला आहे. तसेच मूळ गंगाही प्रवाहित झाली आहे. राजापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या उन्हाळे येथे गंगामाईचे दरवेळी सर्वसाधारणपणे उन्हाळी हंगामात आगमन होते. मात्र, गतवर्षी जून महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून मूळ गंगेचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता; तर गायमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह एकदम कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी सकाळी मूळ गंगा प्रवाहित झाली असून, गायमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहही वाढला आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गंगा प्रवाहित झाल्याची माहिती येथील गंगापुत्र राहुल काळे यांनी दिली.
राजापूरची गंगामाई पुन्हा प्रवाहित
By admin | Updated: July 23, 2014 23:16 IST