शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Ganesh Chaturthi 2018 : स्पेनमधील पर्यटन बोटीवर गणरायाचे पूजन, चौके मधील अमेय गावडेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:15 IST

गणेशोत्सवाच्या काळात आॅरोरा बोट स्पेनमध्ये असून समुद्रात या बोटीवर मराठी माणसं आपापल्या वेगवेगळ्या पोस्टवर काम करीत आहेत. या मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साहपूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

ठळक मुद्देस्पेनमधील पर्यटन बोटीवर गणरायाचे पूजन, चौके मधील अमेय गावडेचा पुढाकारमुंबईतून मागवली गणेश मूर्ती : आॅरोराचा राजा असे नामकरण

अमोल गोसावीचौके (सिंधुदुर्ग) : गणपतीची ओढ साता समुद्रपार असून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना थेट पर्यटन बोटीवर करण्यात आली आहे. पी अँड ओं क्रुझेस ही इंग्लंड बेस कंपनी. त्यांची आॅरोरा हि बोट सध्या गणेशोत्सवाच्या काळात हि बोट स्पेनमध्ये असून समुद्रात या बोटीवर मराठी माणसं आपापल्या वेगवेगळ्या पोस्टवर काम करीत आहेत. या मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साहपूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

श्री गणेशाची आरती करताना अभियंता अमेय गावडे आणि जहाजावरील इतर सहकारी व पर्यटक .बोटीवर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्या नंतर, पूजा अर्चा करताना, आरती गाताना इतर सर्व पर्यटक व गणेश भक्त श्री गणेशाला नतमस्तक होऊन गणेश चतुर्थी साजरी करत होते. अशी माहिती या बोटीवर कार्यरत असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चौके गावाचे सुपुत्र अभियंता अमेय किशोर गावडे यांनी दिली.

इको फ्रेंडली गणेश१३ सप्टेंबरपासून क्रूजवर गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला. मुंबईतून आणलेल्या गणेश मूर्तीला सर्वांनी वंदन केले आणि आॅरोराचा राजा, गणपती राजा असे नाव संबोधिले गेले.

क्रुझ शिप मध्ये कामानिमित्त बाहेर असुनसुध्दा मोठ्या भक्तीभावाने आम्ही सर्वजण गणेशभक्त आपआपल्या कामाच्या वेळा सांभाळून सलग पाच दिवस दुपारी १२.३० वाजता, व रात्रौ ११.३० या ठरलेल्या वेळी आरती करायचो. तसेच यावेळी मॉरिशस, इंडोनेशिया येथील कर्मचारी वर्ग म्हणजेच गणेशभक्त यांची उपस्थिती लक्षणीय असायची.

येथे उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टीची उपलब्धता व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ह्यइको फ्रेंडली गणेशह्ण हा आमचा मुख्य उद्देश होता. तसेच या उत्सवानिमित्त आलेल्या वर्गणीतून किंवा गोळा झालेली देणगी रक्कम ही मदत म्हणून अनाथालय आणि वृध्दाश्रमास देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. ही सर्व सेवा बाप्पानेच आमच्याकडून करून घेतली असे अमेय गावडे यांनी अभिमानाने सांगितले.गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाउत्सवाविषयी अधिक माहिती देताना अमेय गावडे म्हणाले, कि क्रूझ वरील फक्त मराठी बांधवच नाही तर इतर सर्व पर्यटक तसेच कर्मचारीही गणेशोत्सवात सहभागी झाले हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.

परदेशी पर्यटक टाळ, मृदंग, चक्कवा, ढोलकी, या वाद्यावर बेधुंद होतात व तल्लीन होऊन जातात . हे पाहून मन भरून येते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर ऐकताना त्यांचे ते बोल फार कुतूहलाचे वाटतात. त्यांच्या त्या आवाजातील गोडवा निश्चितच समाधान देतो. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग