शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध, तालुक्यात तीन ग्रामपंचायतच्या १० जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:31 IST

Kankavli Grampanchyat Election- कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंचायतमध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभिरवंडे , तोंडवली-बावशी मध्ये ११ जागांसाठी ४० उमेदवारी अर्जतालुक्यात तीन ग्रामपंचायतच्या २१ जागांपैकी १० जागा बिनविरोध

कणकवली: कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंचायतमध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत.तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत . त्यातील गांधीनगर ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्यात प्रभाग १ मध्ये प्रसन्ना प्रशांत सावंत,तुषार भगवान सावंत,राजेंद्र रामचंद्र सावंत,प्रभाग २ मधून मंजुषा महादेव बोभाटे, विनिता दिनेश सावंत आणि प्रभाग ३ मधून मंगेश अनंत बोभाटे, सुनीता अनाजी सावंत या सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले . त्यांच्या विरोधात कोणाचेही अर्ज नसल्याने ही ग्रामपंचाय पूर्णतः बिनविरोध झाली आहे.याठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून ज्ञानेश पाताडे, सहाय्यक तनोज कळसुलकर यांनी काम पाहत आहेत.तोंडवली -बावशी ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत.यात प्रभाग १ मधून दोन जागांसाठी ७, प्रभाग २ मधून तीन जागांसाठी १४ तर प्रभाग ३ मधून दोन जागांसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रमोद पालकर यांनी काम पाहिले. भिरवंडे ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग क्रमांक १ मधील मिलिंद रुक्माजी पवार आणि सुजाता संतोष सावंत या बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत.

प्रभाग २ मध्ये एका जागेसाठी दोन तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग ३ मध्ये विष्णू धर्माजी डीचवलकर हे बिनविरोध झाले आहेत तर एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास राऊत तर साहाय्यक संजय धुरी यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी करण्यात येणार आहे.कणकवली तहसील कार्यालयात भिरवंडे ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली