शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात गणरायाना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:26 IST

कणकवलीतील जानवली तसेच गडनदी वरील गणपती साण्यावर व विविध वाड्यांमध्ये असलेल्या गणपती साण्यावर श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले. तसेच गणराया विनवणी करीत पुढच्यावर्षी लवकर येण्याचे अभिवचन भाविकानी यावेळी घेतले.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात गणरायाना निरोप गणरायाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे अभिवचन

कणकवली : ' मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' चा गजर करीत कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात आला.

कणकवलीतील जानवली तसेच गडनदी वरील गणपती साण्यावर व विविध वाड्यांमध्ये असलेल्या गणपती साण्यावर श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले. तसेच गणराया विनवणी करीत पुढच्यावर्षी लवकर येण्याचे अभिवचन भाविकानी यावेळी घेतले.तालुक्यातील नांदगाव , वाघेरी, वरवड़े , जानवली, साकेडी, फोंडा, तळेरे, कनेडी, हळवल , खारेपाटण आदी भागातहि गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणरायाना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. रात्री उशिरा पर्यन्त विसर्जन मिरवणुका अनेक ठिकाणी सुरु होत्या.२ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणराया घरोघरी आले. गेले अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे पूजन केले जात होते. घरोघरी आरती तसेच भजनाचे सुमधुर सूर उमटत होते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच डबलबारी भजनाचे सामनेही आयोजित करण्यात आले होते.लहान थोर गणरायांच्या सेवेत दंग झाले होते. सत्यनारायण महापूजा तसेच इतर धार्मिक विधींचे आयोजनही या कालावधीत अनेक घरात करण्यात आले होते. त्यामुळे पुरोहितांची लगबग वाढली होती. वेळेचे नियोजन करून पुरोहितानी अनेक घरातील पूजा आटोपल्या.गणरायांच्या सेवेत गुंतल्यामुळे अनेक भाविकाना गणेशोत्सवातील अकरा दिवस कसे सरले ते समजलेच नाही . त्यामुळे गुरूवारी विसर्जनाचा दिवस जवळ आल्यावर त्यांचे अंतःकरण भरून आले. गुरूवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा गणरायाची आरती करून विसर्जन स्थळा पर्यन्त श्री गणेश मूर्ती नेण्यात आली.ढोल ताशांच्या गजरात गणरायाची विसर्जन मिरवणूक अनेक ठिकाणी काढण्यात आली होती.फटाक्यांची आतशबाजी करीत ही मिरवणुक विसर्जन स्थळापर्यन्त नेण्यात आली. त्यानंतर गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले.

उपस्थित भाविकाना प्रसाद वाटण्यात आला. त्याचप्रमाणे 'गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ' असे म्हणत भाविक घरी परतले. गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूकीचे चित्रण ड्रोन कॅमेऱ्यातून करण्यात आले.दरम्यान, सतरा दिवसांनी तसेच एकविस दिवसानिही काही गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात येणार आहे.कड़क पोलिस बंदोबस्त !गणेशमुर्ती विसर्जणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली शहरात कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी होमगार्डसह पोलिस पथके तैनात होती.मानाच्या संतांच्या गणपतीला निरोप !कणकवलीचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंबवाड़ी येथील मानाच्या संतांच्यागणपतीलाही जानवली नदिवरील गणपती सान्यावर निरोप देण्यात आला. टेंबवाड़ी येथून विसर्जन स्थळा पर्यन्त ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. लहान मुलांबरोबरच महिला वर्ग बहुसंख्येने या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.नगरपंचायतकडून गणरायांवर पुष्पवृष्टि !कणकवली नगरपंचायतकडून श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी विविध गणपती साण्यांवर चोख व्यवस्था करण्यात आली होती. परमहंस भालचंद्र महाराज भक्त निवास येथे मण्डप उभारून विसर्जनासाठी जाणाऱ्या श्री गणेशमूर्तिंवर पुष्पवृष्टि करण्यात आली. यावेळी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनsindhudurgसिंधुदुर्ग