शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जुगारअड्ड्यावर छापा प्रकरण; ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:42 IST

पाच वर्षांपूर्वी वेंगुर्ला म्हाडा कॉलनी येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलेल्या ३१ आरोपींची वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच यात जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देजुगारअड्ड्यावर छापा प्रकरण ३१ आरोपींची निर्दोष मुक्तता

वेंगुर्ला : पाच वर्षांपूर्वी वेंगुर्ला म्हाडा कॉलनी येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलेल्या ३१ आरोपींची वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच यात जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताला परत करण्याचे आदेश दिले आहेत.१५ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक साहू यांनी कॅम्प येथील एका शेडमध्ये अचानक छापा  टाकून जुगाराच्या साहित्यांसह, मुद्देमाल आणि रोख रक्कम ८ लाख १९ हजार १२० रुपये जप्त  केले 

यावेळी संतोष गुरुनाथ नाईक, जयेश नामदेव दळवी, शंकर आत्माराम परब, संदेश लक्ष्मण कोचरेकर, श्रीकृष्ण शंकर भोगटे, राकेश भरत परब, गोरख मनोहर शारबिद्रे, विल्यम फ्रांसीस बोरजेस, बसीर सय्यद शेख, रुपेश रमेश सावंत, रवींद्र आत्माराम सावंत, अमित दिलीप जोशी, भूषण दीपक ढवळे, अंकुश बाबा निकम, ओमकार विष्णू मुडये, ज्ञानेश्वर वासुदेव हुले, रमेश धाकू निकम, पाडुरंग बाप पवार, प्रकाश सहदेव देसाई, लक्ष्मण सदानंद म्हाडदळकर, सत्यवान महोदव हरमलकर, सुनिल सखाराम म्हाडगुत, संजय आनंद केरकर, रत्नाकर अनंत मोर्ये, प्रसाद बाळकृष्ण मराठे, दिलीप मधुकर वेंगुर्लेकर, कमलाकर भिवा सरमळकर, भरत गणेश परब, शेखर लक्ष्मण गोळवणकर, यशवंत भास्कर परब आणि शैलेश उर्फ कुमा गुंडू गावडे या ३१ जणांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी वेंगुर्ला न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून सबळ पुरावे सादर न झाल्याने वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

दरम्यान, आरोपींच्यावतीने युक्तीवाद करताना अ‍ॅड. प्रथमेश नाईक यांनी या घटनेवेळी जप्त केलेली रक्कम कुमा गावडे यांची वैयक्तिक आहे. त्याचा जुगाराशी संबंध नाही असा युक्तीवाद केला. तो ग्राह्य मानून जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताना परत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग