शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री राणेंच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २५ लाखाचा निधी, सत्ताधारी व विरोधकामध्ये जोरदार खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:08 IST

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत पंचवीस लाख रूपये खर्च करणार आहे. ...

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत पंचवीस लाख रूपये खर्च करणार आहे. मात्र, त्या ठिकाणी अगोदरच रस्ता आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील या रस्त्यासाठी शहरवासीयांच्या करातून जमा झालेला निधी खर्च का करायचा? असा सवाल नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला. तसेच या प्रस्तावास आपला विरोध असल्याचे सांगितले. त्यावरून गुरुवारी नगरपंचायत सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने कणकवली नगरपंचायतीची ऑफलाईन सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष  बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात झाली.या सभेत प्रामुख्याने केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचा प्रश्न चर्चेत आला. नगरसेवक कन्हैया पारकर यांनी या रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप केला. सत्ताधार्‍यांनी त्याला आक्षेप घेतला. या मुद्द्यावर बराच वेळ चर्चा झाल्यावर पारकर यांनी आपला या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शिघकृती दल स्थापन करण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी बँडअँब्रेसीडरमधून उद्योजक दीपक बेलवकर यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायाचा पुतळा स्थालांतरणाबाबत दोन जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित होण्याबाबत प्रक्रियेबाबत माहिती बंडू हर्णे यांनी दिली. तसेच या जागांचे हस्तांतरण करण्याबाबत ठराव घेऊन जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले.       विरोधी पक्षाचे गटनेते सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक अथवा इतर नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून नगरपंचायतला निधी देताना आधी कामे ठरवावी. म्हणजे त्यांना निधीची कल्पना येईल. अशी विनंती बंडू हर्णे यांनी केली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक संजय कामतेकर, अ‍ॅड. विराज भोसले,उर्वी जाधव, अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, अबिद नाईक, मेघा सावंत, कविता राणे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेेश नार्वेकर, माही परुळेकर, मानसी मुंज यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीNarayan Raneनारायण राणे