शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र :नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:13 IST

कोकणचा विकास आणि जिल्ह्यातील तरुणांना दिशा देण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन ठिकाणी मोफत ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करत असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.

ठळक मुद्देभरतीमध्ये कोकणातील तरुण असावेत१२ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर कालावधीत नाव नोंदणी

कणकवली : कोकणातील विद्यार्थ्यांचा दहावी, बारावीमध्ये अव्वल क्रमांक असतो. त्यानंतर पुढच्या कालावधीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये मागे पडतात. त्याचा परिणाम कोकणातील विकासावर होत आहे. जर प्रशासनात उच्च पदस्थ अधिकारी हे कोकणातील असले तर स्थानिक समस्या आणि विकासाची गरज याचा ताळमेळ बसेल. मग आम्हाला चिखलफेकीसारखी आंदोलने करावी लागणार नाहीत.

कोकणचा विकास आणि जिल्ह्यातील तरुणांना दिशा देण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन ठिकाणी मोफत ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करत असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा परिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रा. गणेश काटकर, अ‍ॅड. अमोल गवळी, ड्रीम फाऊंडेशनचे प्रा. सुशिल अहिरराव आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, मी गेली काही वर्षे शिक्षण तज्ज्ञांना भेटून कोकणातील तरुण-तरुणींना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावे लागेल? याची चाचपणी करत होतो. त्याचा परिपाक म्हणून ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आता सुरु करण्यात येत आहे. ड्रीम फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्र काम करेल.आता शासकीय ८० हजार पदांची भरती होत आहे. तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे प्रशासनात जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचारी कोकणातील असावेत. ही आपली भुमिका आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती झाल्याने प्रशासनात मोठी भरती या भागातील लोकांची झाली. मात्र, प्रशासनाच्या कुठल्याही विभागाचा कारभार पाहिला तर हे अधिकारी आपल्या खुर्चीला किती न्याय देतात? हे आपण पाहत आहोत.

कोकणच्या मातीबद्दल त्यांना प्रेम नसल्याने येथील जनतेबद्दलही त्यांना आस्था नाही. हे चित्र बदलायचे असेल तर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कोकणातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या बाबत जागृती करावी लागेल . त्यामुळे प्रशासनात दाखल होण्याची संधी आपण या केंद्राच्या माध्यमातुन येथील तरुणांना देणार आहोत. असे नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.

या ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्रात सहभाग घेण्यासाठी १२ सप्टेंबर ते १ आॅक्टोंबर या कालावधीत नाव नोंदणी करायची आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज, वैभववाडी येथे महाराणा प्रताप सांस्कृतिक कला दालन, देवगड येथे वॅक्स म्युझियम तिसरा माळा या तीन ठिकाणी ही मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन केंद्रात सहभाग व्हावे असे आवाहनही यावेळी नीतेश राणे यांनी केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाsindhudurgसिंधुदुर्ग