शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमधील चार दुकाने भीषण आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:53 IST

रजनीकांत कदम ।लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला रविवारी रात्री भीषण आग लागली. ही घटना साडेदहाच्या सुमारास घडली असून, आग पसरल्याने शेजारील अन्य तीन दुकाने खाक झाली आहेत. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ बाजारपेठेत ...

रजनीकांत कदम ।लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला रविवारी रात्री भीषण आग लागली. ही घटना साडेदहाच्या सुमारास घडली असून, आग पसरल्याने शेजारील अन्य तीन दुकाने खाक झाली आहेत. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ बाजारपेठेत भोगटे फटाके दुकान असून, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या दुकानाला आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणावर फटाके असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता दुकानाच्या शेजारील कॉस्मेटिक, कपडे आणि चपलाचे दुकान आगीत सापडले. आग विझविण्यासाठी तातडीने कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी येथून अग्निशमनचे बंब मागविण्यात आले. मात्र, ते बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. विविध प्रकारच्या फटाक्यांमुळे आग आणखीनच पसरत आहे. विद्युततारा जळाल्यामुळे परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. अन्य दुकानांना आग लागून नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी त्या दुकानांतील साहित्य बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.---