शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:24 IST

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी चौघांना अटकसंशयितांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा होता दाखल

कणकवली : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. या चारही आरोपींना ओरोस येथील जिल्हा विशेष न्यायालयात गुरुवारी हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कणकवली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी सुधीर रामचंद्र पवार (२९) याच्याविरोधात पीडित युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांच्याकडे तपासासाठी वर्ग झाला होता. या शाखेने या प्रकरणातील संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणात मुख्य संशयित सुधीर रामचंद्र पवार (२९) याला संबंधित गुन्ह्यासाठी मदत करणारे संशयित दीपक भिकू पवार (४३), मंगल केशव पाटील (३४), राजाराम कृष्णांत पाटील (३४, सर्व राहणार आसनगांव, ता. खटाव, जि. सातारा) यांनाही अटक केली आहे.

संशयितांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. वर्षभरापूर्वी संशयित आरोपींनी कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन सावंतवाडी येथील अंकुर सुधारगृहात ठेवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग