शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणाऱ्या वसुंधरा ट्रस्टचे संस्थापक सी.बी.नाईक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:17 IST

बाबा आमटे यांच्या ज्या शिष्यांनी संस्था काढून २५-२५ वर्षे चालवल्या, त्यात सी.बी. नाईक यांचा समावेश आहे.

 सावंतवाडी - कोकणातील कुडाळ नेरूर येथील वसुंधरा ट्रस्ट या विज्ञान प्रसार करणा-या संस्थेचे संस्थापक सी.बी.नाईक(85) यांचे वृध्दापकाळामुळे शनिवार दिनांक १८ एप्रिल, २०२० रोजी पहाटे निधन झाले. प्रकृतीच्या कारणास्तव गेले वर्षभर ते घरीच होते आणि नुकत्‍याच झालेल्‍या वसुंधरा ट्रस्टच्‍या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला ते जाऊ शकले नाहीत. बाबा आमटे यांच्या ज्या-ज्या शिष्यांनी संस्था काढून २५-२५ वर्षे चालवल्या, त्यात सी.बी. नाईक आणि डॉ. अशोक  बेलखोडे (साने गुरुजी रुग्णालय, किनवट, नांदेड) यांचा प्रामुख्‍याने समावेश आहे.बँक ऑफ इंडियात कामाला असणा-या सी.बी.नाईक यांनी तेथून स्वेच्छा निवृत्ती घेत कुडाळ या आपल्या मूळ गावी वसुंधरा ट्रस्टची स्थापना करून कुडाळ व आजूबाजूच्या  भागातील मुलांना विज्ञानाची गोडी लावली. एवढेच नव्हे तर त्यांना उच्च शिक्षणासाठी पात्र करण्याचे दुष्कर काम त्यांनी लीलया पार पाडले. ही संस्था चालवण्यासाठी त्यांनी मुंबईतून सतत पैसे जमा केले. 2017 मध्‍ये मराठी विज्ञान परिषदेचे ५२ वे अखिल भारतीय अधिवेशन त्यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे भरले होते.

सीबी काकांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी केलेले कार्य मोठे - सुरेश प्रभूसिंधुदुर्ग  जिल्ह्यात वसुंधरा विज्ञान संस्थेच्या माध्यमातून विज्ञान चळवळ रुजवणारे, भारत रत्न बाबा आमटेचे सह्कारी व माझे जेष्ठ मित्र  सी बी नाईक उर्फ सी बी काका हे आज अनंतात विलीन झाले सिंधुदुर्गातील  विज्ञानाबद्दलचे कुतूहल हेरून सीबी काकांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी निर्माण केलेले फार मोठे कार्य वसुंधराच्या माध्यमातून आज उभे आहे.अनेक दशकातून असे विज्ञानप्रेमी समाजसेवक निर्माण होतात.सीबी काकांच्या कार्यास आणि स्मृतीस माझे अभिवादन.त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवणे हिच त्याना खरी श्रद्धांजली.

टॅग्स :scienceविज्ञानsindhudurgसिंधुदुर्ग