मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शिवसैनिकांची मोठी मदत वीज वितरणला मिळाली.काही दिवसांपूर्वी समुद्रात घोंगावलेल्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान किल्ले सिंधुदुर्ग येथे माडाचे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळले. यात वीज तारा व वीज खांब तुटून नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, खराब समुद्री हवामानामुळे तत्काळ दुरुस्ती काम शक्य नव्हते. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा याबाबत जलदगतीने कार्यवाहीसाठी आमदार वैभव नाईक, तहसीलदार अजय पाटणे यांचेही लक्ष वेधण्यात आले.आमदार नाईक यांनी वीज वितरणला तत्काळ वीज समस्या सोडवण्याची सूचना केली. याकामी समुद्री होडी प्रवासादरम्यान शिवसैनिक आवश्यक ते सर्व सहकार्य करतील असे सांगितले. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न वीज वितरणने केला.दरम्यान, गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने वीज वितरणने दुरुस्ती हाती घेतली. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे नेणे काहीसे जोखमीचे होते. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपशहरप्रमुख संमेश परब, गोट्या कोयंडे आदी शिवसैनिकांनी याकामी सहकार्य केले.
किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:09 IST
किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शिवसैनिकांची मोठी मदत वीज वितरणला मिळाली.
किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत
ठळक मुद्देवीज खांब पोहोचले किल्ले सिंधुदुर्गवर मच्छिमार, शिवसैनिकांचे वीज वितरणला सहकार्य