शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने केला तीन कोटींचा भ्रष्टाचार, वैभव नाईक यांची वनमंत्र्यांसह वनसचिवांकडे तक्रार

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 16:57 IST

तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये

कणकवली: कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तर १ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची विकासकामे मंजूर करून ती आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच वाटप केली असून प्रत्यक्षात कामे न करताच केवळ कागद रंगवून कामांची देयके काढली आहेत. शासकीय निधीत भ्रष्टाचार करून आता स्वतःची बदली परजिल्ह्यात करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कोणाचा पाठिंबा आहे, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.   याबाबत त्यांनी वनमंत्री, वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती, गवारेडे असे वन्यप्राणी शेती फळबागायतींचे नुकसान करीत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र, कायदे धाब्यावर बसवून शासकीय निधीत अपहार करण्यात व्यस्त आहेत.अपहार लोकांना समजण्याअगोदर अधिकारी स्वतःची बदली परजिल्ह्यात करून घेण्याची नवीन पद्धत जिल्ह्यात रुजविली जात आहेत. अनेक शासकीय विभागात असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर सर्व कामांची सखोल चौकशी करावी. तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी तक्रार वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नयेकणकवली वनपरिक्षेत्रासाठी जिल्हानियोजन मधून १ कोटी ३६ लाख ८४ हजार ३२ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्या निधीमधून कणकवली वनपरिक्षेत्राच्या विकासाची कामे मंजूर करणे आवश्यक असताना कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी अनावश्यक स्वरुपाची २१ कामे मंजूर केली आहेत. यापैकी एकाच मजूर संस्थेला एकूण १२ कामे देण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या काम वाटप नियमाचे (मजूर संस्था ३३ टक्के, सुशिक्षितबेरोजगार अभियंता ३३ टक्के, खुला प्रवर्ग ३३ टक्के) उल्लंघन करून उर्वरित ९ कामे देखील आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांची तसेच कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत त्यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.