शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:27 IST

पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार प्रशासकीय उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीचा प्रकार

बांदा : पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशीआरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

पत्नीची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली असतानाही पैशांचे आमिष दाखवून कुटुंबीयांना अंधारात ठेवत प्रशांत यांची बळजबरी नसबंदी करण्यात आली. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांची पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी बांदा पोलिसांत दिला आहे.पाडलोस येथील प्रशांत नाईक हे बाधकांम काम व मोलमजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व दोन अनोळखी व्यक्ती यांनी प्रशांतला भेटून नसबंदीसंबंधी माहिती दिली. त्यानंतर प्रशांतला नसबंदी केल्यानंतर ४० हजार रुपये बँक खात्यात जमा होतील असे खोटे सांगितले. प्रशांतची खात्री होण्यासाठी केंद्राचे कर्मचारी यांनी नाईक यांच्या घरी जात बँक पासबुक व आधारकार्ड यांची झेरॉक्स प्रत घेतली. यावेळी पत्नीने यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली. बांधकाम केलेल्या मजुरीचे पैसे जमा करण्यासाठी कागदपत्रांची गरज असल्याचे सांगून नसबंदी शस्त्रक्रियेबाबत त्यांनी पत्नीला पूर्णपणे अंधारात ठेवले.तिघाही संशयितांनी प्रशांतला प्रथम मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले. काही कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेऊन त्याला थेट शासकीय रुग्णवाहिकेतून कणकवली येथील खासगी दवाखान्यात नेले. शस्त्रक्रिया बिनटाक्याची न करता टाके घालून करण्यात आली. प्रचंड दुखापत व असह्य वेदना असतानाही सायंकाळी प्रशांतला त्यांना दांडेली-आरोस बाजार येथे बाजारपेठेत सोडून तिघांनी तेथून पलायन केले. यावेळी प्रशांतला घरी सोडण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही.त्याचवेळी आपण फसलो गेल्याचे प्रशांत यांच्या लक्षात आले. मात्र, त्यांनी याची घरच्यांना कल्पना दिली नाही. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणावेळी रक्तस्राव होत असल्याचे प्रशांतची पत्नी प्रतीक्षा हिच्या लक्षात आले. अधिक विचारपूस केली असता प्रशांतने पत्नी व भावाला झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.प्रशांत यांच्या पत्नीने बांदा पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशांत यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.आरोग्यकेंद्रात विचारला जाबअज्ञानाचा फायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्यांचा भाऊ विश्वनाथ यांनी बांदा पोलिसांसमोर केला. त्या तिघांसह मळेवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कणकवली येथील खासगी दवाखान्याचे डॉक्टर या सर्वांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पाडलोस येथील तरुणावर हा अन्याय झालेला आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी किती टोकाला जाऊ शकतात हे यातून सिद्ध झाले. जिल्हा परिषद सदस्या तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्षा शर्वाणी गावकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत गुरूवारी मळेवाड आरोग्यकेंद्रात जाब विचारला जाईल.- अक्रम खान, सरपंच बांदा

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग