शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga: सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

By अनंत खं.जाधव | Updated: March 8, 2024 12:54 IST

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. ...

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर तेथेच उपचार करण्यात येतील असे आरोग्य केंद्रातून सांगण्यात येत आहे.दरम्यान मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाब सुरू झाल्याने येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ यांनी स्पष्ट केले आहे.सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 43 मुला मुलींना पहाटे तीन वाजल्यापासून झुलाब व उलटी सुरू झाली. नवोदय विद्यालय प्रशासनाकडून तातडीने या विद्यार्थ्यांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यातील काही विद्यार्थी हे झुलाब व उलटी ने घायाळ झाले होते. त्यांना लागलीच उपचार देण्यात आले आहेत. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी रूग्णालयात दाखल होत विद्यार्थ्यांना धीर दिला. गुरूवारी रात्रीचे जेवण विद्यार्थ्यानी मेसमध्ये घेतले त्यानंतर ते झोपी गेले होते. त्यातच पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक कारण चौकशीत पुढे आले आहे. जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा  अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत, असे शिक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून विद्यार्थ्यांना अधिक उपचार हवे असल्यास सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStudentविद्यार्थी