शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पूरपरिस्थितीचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: January 4, 2017 21:48 IST

अरूण नातूंची माहिती : बाधित क्षेत्राचा अहवाल राज्य शासनास सादर

सिंधुदुर्गनगरी : जुलै ते आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० गावांतील १९८९ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली. जुलै ते आॅक्टोबरदरम्यान सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. याचा फटका भातशेतीबरोबरच फळपीक व जमिनीलाही बसला होता. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासन निर्देशाच्या अधीन राहून अहवाल दिल्याची सूचना केली होती. त्यानुसारच अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून१९८९शेतकरीबाधित झाले आहेत. त्यांचे एकूण २६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे. शेतीपिकाच्या नुकसानीचा जास्तीचा समावेश असून या पिकाचे२६१.१ हेक्टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे.फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर २ गावांतील ४ शेतकऱ्यांमध्ये ५० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे. मार्चपर्यंत मदतीची शक्यताचार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या क्षेत्राचा अहवाल संयुक्त स्वाक्षरीने राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मंजूर होऊन साधारणत: मार्च महिन्यापर्यंत नुकसान भरपाईपोटी निधी मिळण्याची शक्यता आहे.देवगड, मालवण, कुडाळ नुकसानी नाहीराज्य शासनाच्या कृषी विभागमार्फत करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व कुडाळ या तीन तालुक्यांमध्ये जुलै ते आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.तालुकाबाधित शेतपिकेफळपिकेजमिनीचे नुकसानकणकवली२२.६ हेक्टर९५ गुंठे-वैभववाडी१३.२८ हेक्टर१ गुंठा५७ गुंठेसावंतवाडी४.७३ हेक्टर२३ गुंठे-दोडामार्ग३५.६ हेक्टर--वेंगुर्ला१८५ हेक्टर--एकूण२६१.२१ हेक्टर११९ गुंठे५७ गुंठे