शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga: गोवेरीत लोखंडी साकव कोसळून पाचजण जखमी, सुदैवाने दोन चिमुकले बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:22 IST

जखमींना कुडाळ व वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

कुडाळ : गोवेरी भगतवाडी येथील लोखंडी साकव कोसळून पाच जण पाण्यात कोसळून जखमी झाले. जखमींना कुडाळ व वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच जखमींचे मोबाईल तसेच इतर साहित्यही पाण्यात पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. एक लहान मुलगा व मुलगी वाचली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.वेंगुर्ला येथील काहीजण कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आले होते. ते सर्वजण गोवेरी भगतवाडी येथील साकवावरून जात असताना त्या लोखंडी साकवाचा काही भाग कोसळला व तेथून जाणाऱ्या सहा जणासह एक लहान मुलगा खाली पडला. यामध्ये तीन महिलांसह पाचजण जखमी झाले.ही घटना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी तत्काळ तेथे जात जखमींपैकी दोघांना कुडाळ तर तिघांना वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी काहींचे मोबाईल व इतर साहित्य ही पाण्यात पडले. मागून येणारी माणसे ही साकवावर आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी दिली.

अडकल्याने लहान मुलगा वाचलाया घटनेत सहा जणासह एक तिसरीतील मुलगा ही खाली कोसळला. सुदैवाने हा मुलगा साकवाच्या एका भागाला अडकून राहिला त्यामुळे तो वाचला.

वडिलांनी मुलीला वाचविलेया घटनेत एका लहान मुलीला घेऊन तिचे वडील जात होते. त्याच क्षणी हा साकव कोसळला व त्यांनी तत्काळ मुलीला बाजूला ओढून घेतले व सुदैवाने ती छोटी मुलगी वाचली.तो लोखंडी साकव सुमारे २५ वर्षे जुना असून त्याची उंची सुमारे २५ ते ३० फूट आहे. या साकवाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र अजूनही दुरुस्ती करण्यात आली नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग