शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत रानडुकरांची तस्करी करणारे पाच जण ताब्यात

By अनंत खं.जाधव | Updated: December 10, 2023 19:03 IST

सावंतवाडी व सांगली येथील वनविभागाची संयुक्त कारवाई: मुख्य संशयित सांगलीचा

सावंतवाडी : तब्बल १० जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या सांगली येथील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी वनविभागाला यश आले आहे. ही कारवाई रविवारी सावंतवाडी व सांगली वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. वनविभागाकडून तब्बल ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील रोहित कोळी याने रानडुक्कर आणि साळींदर या वन्य पाण्याची शिकार करून तो व्हिडिओ कोळी यानेच शिकारवाला या इंस्टाग्राम पेजवर व्हायरल केली होता. त्याचा शोध घेत असताना हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक आरोपीला वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले. रोहित कोळी शिकारवाला या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल केला होता याची माहाती वनविभागाला मिळाल्यानंतर आरोपी रोहित कोळी चा शोध सावंतवाडी वनविभागाकडून सुरू करण्यात आला 

त्यावेळी रोहित कोळी  हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले. या संशयित आरोपीचा वनविभागाकडून ठावठिकाणा शोधला त्यावेळी हा संशयित सांगली येथेच राहात असल्याचे स्पष्ट झाले.यासाठी सांगली वनविभागाकडून ही मदत करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाने फिरते पथक सांगली यांची मदत घेतली व तसा सापळा ही   रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली महामार्गावर रोहित कोळी व इतर 5 सशयित आरोपी यांना 10 जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. 

या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी व सांगली येथील वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी  एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक  अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

नावाबाबत गृप्तता 

सावंतवाडी वनविभागाकडून मुख्य संशयित आरोपीचे नाव जाहीर केले असले तरी अन्य आरोपीचे नाव तसेच कुठे शिकार केली कोणाची बंदुक वापरली याबाबत अद्याप पर्यत जाहीर वाच्यता केली नसून तपास कामात अडथळा येईल म्हणून ही नावे गृप्त ठेवण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग