शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागून पाच गुरे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:04 IST

कुडाळ तालुक्यात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाव येथे विद्युततारा तुटून पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनवडे गावातील गुरे चरण्यासाठी आली असता त्यातील पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागून ही पाचही गुरे जागीच मृत्युमुखी पडली.

ठळक मुद्देविजेचा धक्का लागून पाच गुरे जागीच ठारसुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाव येथे विद्युततारा तुटून पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनवडे गावातील गुरे चरण्यासाठी आली असता त्यातील पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागून ही पाचही गुरे जागीच मृत्युमुखी पडली. ही गुरे सोनवडे बळीचे टेंबमधील शेतकरी सुधीर शंकर आसोलकर यांची होती. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सोनवडे बळीचे टेंब येथील शेतकरी सुधीर आसोलकर नेहमी गुरे चरविण्यासाठी येथे घेऊन येतात. बुधवारी मध्यरात्री कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. बांव गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी दिलेल्या विद्युत पुरवठ्याच्या खांबावरील विद्युततारा जमिनीवर कोसळल्या होत्या. याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुधीर आसोलकर यांनी आपली गुरे चरविण्यासाठी तेथे आणली होती.गुरे चरत असताना विद्युततारा तुटलेल्या ठिकाणी ती गेली आणि एका मागोमाग पाच गुरांना विद्युत तारांचा धक्का लागला. त्यात पाचही गुरे मृत्युमुखी पडली. यामध्ये गाभण चार म्हशी, गाभण एक गाय आणि छोटे वासरू होते. मात्र, तीन गुरांना सुधीर आसोलकर यांनी वाचविले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली तसेच विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर विद्युत पुरवठा बंद केला. या दगावलेल्या म्हशींसोबतच जंगलातील कोल्हासुद्धा विद्युत तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडला होता.यावेळी बांव सरपंच नागेश परब, ग्रामसेविका मसके, सोनवडे तंटामुक्ती अध्यक्ष महिपाल धुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पशुसंवर्धनचे मुळीक, डॉ. चव्हाण, डॉ. खवणेकर यांनी मदतकार्य करून या घटनेचा पंचनामा केला. या गुरांचा सुमारे दोन लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा पंचनामा करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग