शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:42 IST

forest department Sindhdurgnews-फोंडाघाटच्या वनक्षेत्रामध्ये औषधे गोळा करण्याकरिता गेलेल्या आदिवासी कातकरी महिलेसह पाच जणांना मारहाण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देफोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित कातकरी लोकांना मारहाण प्रकरण

कणकवली : फोंडाघाटच्या वनक्षेत्रामध्ये औषधे गोळा करण्याकरिता गेलेल्या आदिवासी कातकरी महिलेसह पाच जणांना मारहाण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.ही मारहाणीची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. फोंडाघाट-गांगोवाडी माळ येथे राहणार्‍या कातकरी आदिवासी कुटुंबांपैकी सखू पवार हिच्यासह अन्य पाच जण फोंडाघाट जंगलात औषधी मुळे, झाडपाला गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी वनपाल आणि कर्मचार्‍यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. सामाजिक संघटनांनी त्यासाठी आवाज उठविला होता.त्यानुसार वनपाल व कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तर त्यांना जिल्हा न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी दिली होती. कणकवलीच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळुंके यांनी या घटनेचा तपास करून संशयित कर्मचार्‍यांवर कारवाई केली होती.हा प्रकार उघडीस आल्यानंतर अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शैलजा कदम, सत्यशोधक संघटनेचे अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात कातकरी यांच्यासोबत जाऊन तक्रार दिली आणि नाहक मारहाण केल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटीची मागणी केली होती.सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना एखाद्या गुन्ह्यात ४८ तास पोलिस कोठडी झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. त्यानुसार उपवनसंरक्षक नारनवर यांनी फोंडाघाट वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली असल्याचे वनविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग